‘आकाशा’त भरारी मारण्याची संधी

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 12:46

जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट आकाशची निर्माती डाटाविंडने विद्यार्थी आणि सोशल नेटवर्किंग स्टार्टअपसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आकाशचे निर्माते डाटाविंड यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ट ऍप्लिकेशन्स आकाशमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

ब्रेन कॅफे सायन्टीस्ट स्पर्धेला सुभाष चंद्रांची उपस्थिती

Last Updated: Sunday, November 27, 2011, 12:46

विद्यार्थांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी ब्रेन कॅफेतर्फे सायन्टीस्ट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, विद्यार्थांचे कलागुणा साऱ्या जगासमोर यावेत याच उद्देश या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होतं. यामुळे या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद होता.

रिमचे नवे हँडसेट बाजारात दाखल

Last Updated: Tuesday, December 27, 2011, 12:13

अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत आरआयएमचे (Research In Motion) सात हँडसेट उपलब्ध आहेत. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत ही नवी मॉडेल्स अधिक वेगवान, चांगल्या प्रकारे ब्राऊझिंगचा आनंद देणारी आणि मल्टिमीडिया उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आरआयएमचे स्मार्टफोन्स देशभरात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील.

वाट्टेल तेवढे एसएमएस... चकटफु!

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 04:50

योगेश पटेल यांच्यासोबत विकसित केलेल्या जेक्स्टर एसएमएस या नव्या अ‍ॅप्लीकेशनद्वारे कुठूनही, कुठेही आणि कितीही एसएमएस आता फुकटमध्ये पाठवायची सोय साबीर भाटीया यांनी केली आहे.

मोबाईल ब्लॉकची होणार 'ट्राय'

Last Updated: Monday, November 21, 2011, 06:54

मोबाईल चोरीला गेला किंवा तो हरविल्यास आता तो 'ब्लॉक' होऊ शकणार आहे. त्यादृष्टीने दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) प्रयत्न सुरू केले आहेत.

आला रे आला नवा आयफोन आला

Last Updated: Friday, November 18, 2011, 15:28

ऍपल iPhone 4S च्या किंमती जाहीर झाल्या आहेत. एअरटेल iPhone 4S (16 GB) चे बेस मॉडेल ४४,५०० रुपयांना तर 64 चे टॉप एंड मॉडेल ५७,५०० रुपयांना उपलब्ध करुन देणार आहे. तर 32 GB चे मॉडेल ५०,९०० रुपयांना मिळेल.

'आकाशा'ला गवसणी

Last Updated: Thursday, November 17, 2011, 15:03

जगातील सर्वात स्वस्त ३००० रुपये किंमतीची टॅबलेट आकाशला तीन लाखाचं बुकिंग प्राप्त झालं आहे. आकाश पुढच्या महिन्यात बाजारात उपलब्ध होईल. इंग्लंडच्या डाटाविंडची निर्मिती असलेलं आकाशचं सबसिडाईझ्ड मॉडेल सध्या शाळा आणि महाविद्यालांमध्ये मोफत वितरीत करण्यात येत आहे

आचार्य नव्हे रोबोट देवो भव...

Last Updated: Thursday, November 17, 2011, 11:46

मध्यपूर्वेतील देशांमध्ये आता ह्युमनोईड रोबोट वापर शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये करण्यात येणार आहे. ह्युमनोईड रोबोटच्या वापरामुळे शास्त्र आणि गणित या विषयांच्या शैक्षणिक प्रक्रियेत क्रांतीकारक बदल घडवतील. अल्डबरन रोबोलिटक्स ही फ्रेंच कंपनी इंटेलबरोबर भागीदारीत ह्युमनोईड रोबोटचा मध्यपूर्वेतील शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक प्रक्रियेत परिणामकारक वापर करता येतो हे दाखवून दिलं.

ऑपरेटींग सिस्टीमचा 'लिटील मास्टर'

Last Updated: Sunday, November 13, 2011, 07:28

नागपूरमध्ये एका १५ वर्षीय मुलानं स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम तयार केली. असद दमानी या मुलांन एक वर्षाच्या कालावधीत ही सिस्टीम तयार केली. मायक्रोसॉफ्ट, विन्डोज अशा सिस्टीमपेक्षा अधिक आधुनिक ऑपरेटींग आपण बनवल्याचा दावा असदनं केला.