<b>नोकरीची संधी: कावेरी ग्रामीण बँकेत ७१६ जागा</b>

नोकरीची संधी: कावेरी ग्रामीण बँकेत ७१६ जागा

Last Updated: Monday, December 16, 2013, 16:25

कावेरी ग्रामीण बँक ही एक प्रादेशिक ग्रामीण बँक आहे, २०१२मध्ये कर्नाटकातील तीन क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणानंतर ही बँक निर्माण झालीय. बँकेचं मुख्य कार्यालय म्हैसुरला असून कर्नाटक राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बँकेच्या शाखा आहेत.

नोकियाचा `ल्युमिया १५२०` भारतात लॉन्च!

Last Updated: Monday, December 16, 2013, 14:10

सर्वात टिकावू म्हणून नावलौकिक मिळवणारे अनेक फोन ‘नोकिया’ कंपनीनं बाजारात आणलेत. आता, याच कंपनीचा ल्युमिया १५२० हा स्मार्टफोन (किंवा फॅब्लेट) भारतात येतोय. आजच हा फोन भारतात लॉन्च करण्यात आलाय.

सावधान… अँड्रॉईड स्मार्टफोन प्रायव्हेट राहणार नाही!

सावधान… अँड्रॉईड स्मार्टफोन प्रायव्हेट राहणार नाही!

Last Updated: Sunday, December 15, 2013, 22:27

जगभरात अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना यापुढं सुरक्षा आणि प्रायव्हेट या दोन पर्यायांपैकी केवळ एकाची निवड करावी लागणार आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणारी कंपनी `गुगल`नं आपल्या सर्व स्मार्टफोनमधून खाजगी माहिती सुरक्षित ठेवणारं तंत्र हद्दपार केलंय. अँड्रॉईडच्या ४.३ आवृत्तीमध्ये खाजगी माहिती खाजगी ठेवणारं तंत्र चुकून टाकल्यानं ते काढण्यात आल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय.

मायक्रोमॅक्स काढणार महागडे हॅण्डसेट

मायक्रोमॅक्स काढणार महागडे हॅण्डसेट

Last Updated: Saturday, December 14, 2013, 19:47

अवघ्या दोन वर्षांपूर्वी मोबाइल हॅण्डसेट बाजारपेठेत आलेल्या मायक्रोमॅक्स कंपनीने स्मार्टफोन बाजारात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर आता ही कंपनी महागडे स्मार्टफोन आणि विदेशी बाजारपेठेत विस्तार करू इच्छित आहे.

मुंबई पालिकेत आरोग्य विभागात भरती

Last Updated: Friday, December 13, 2013, 11:08

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांर्तगत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन आणि विशेष अधिकारी (कुटुंब कल्याण) या विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक परिचारिका प्रसविका या संवर्गातील रिक्त आणि संभाव्य रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

<b><font color=red>नोकरी संधीः</font></b> भारतीय स्टेट बँकेत ४६ जागा

नोकरी संधीः भारतीय स्टेट बँकेत ४६ जागा

Last Updated: Thursday, December 12, 2013, 21:12

स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये विविध पदासाठी ४६ जागा..

`व्हॉट्स अॅप`वर शेअर करताना जपून,  होईल गुन्हा दाखल!

`व्हॉट्स अॅप`वर शेअर करताना जपून, होईल गुन्हा दाखल!

Last Updated: Thursday, December 12, 2013, 19:23

सोशल मीडिया आणि मोबाईल अॅलप्स खूप लोकप्रिय होत आहे, पण यामाध्यमातून काही गुन्हेही होत असल्याचे दिसून येत आहे. आता `व्हॉट्स अॅ प` या मोबाईल अॅुप्लीकेशनवर संवेदनशील माहिती टाकल्यास संबंधितावर व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा पुणे पोलिसांनी दिल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.

इंटरनेटशिवाय मोबाईलवर ट्विटर,  टिव टिव करणं सोपं

इंटरनेटशिवाय मोबाईलवर ट्विटर, टिव टिव करणं सोपं

Last Updated: Thursday, December 12, 2013, 08:12

तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट नाही. मात्र, तुम्हाला ट्विटर या सोशल साईट माध्यमातून टिव टिव करायची झाल्यास ते आता शक्य होणार आहे. तुमच्या मोबाईलवर इंटरनेट शिवाय ट्विटर सुरू करता येणार आहे. त्यासाठी यूएसएसडी तंत्रज्ञानाचा वापर करून ‘युटोपिया मोबाईल ऍप्स’ची निर्मिती केली आहे.

स्वस्तात ‘फोर जी’ इंटरनेट सुविधा मिळवायचीय तर...

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 16:14

‘थ्री जी’नंतर आता ‘फोर जी’सुविधा भारतात लवकरच सुरू होणार आहे. हीच सुविधा ग्राहकांपर्यंत विनाअडथळा पोहचवण्यासाठी ‘भारती एअरटेल’ आणि ‘रिलायन्स जीओ’ या दोन कंपन्यांनी हात मिळवणी केलीय.

११-१२-१३ ची सोशल मीडियात धूम, योग तब्बल ९०वर्षांनंतर

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 11:40

१-१-१, २-२-२, १२-१२-१२ आणि आता आज आलेली या शतकातली शेवटची अनेखी तारीख ११-१२-१३. सध्या सोशल मिडियावर ११-१२-१२ या तारखेने सर्वांनाच भुरळ घातलीये. तरुणाई तर या तारखेच्या शुभेच्छा देण्यात आणि आजच्या तारखेला आयुष्यभर स्मरणात ठेवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा बेत आखतीये. आता अशा तारखेचा योग तब्बल ९० वर्षानंतर येणार आहे.