बजाजची नवी स्पोर्टस् बाईक

Last Updated: Thursday, February 2, 2012, 13:29

बजाज पल्सरची नवी स्पोर्टस् बाईक 200NS ही बाजारात आणली आहे. बजाज ऑटोने ही नवी पल्सर 200NS चे मॉडेल तयार करताना मध्यमवर्गीय ग्राहक डोळ्यासमोर ठेवले आहेत. या 200NSची किंमत १ लाखांपेक्षा कमी असणार आहे, अशी माहिती बजाज ऑटोचे प्रबंधक राजीव बजाज यांनी सांगितले.

गुगल प्लसचे नऊ कोटी युझर्स

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 15:14

फेसबुकला मिळणार्‍या जनाधारामुळेधास्तावलेल्या गुगलने गेल्या जूनमध्ये सुरू केलेल्या गुगल प्लसचाही जम बसण्यास सुरुवात झाली असून, सरत्या आठ महिन्यांत नऊ कोटी युझर्सचा टप्पा कंपनीने पार केला आहे.

दिमाख एनफिल्डच्या 'थंडरबर्ड'चा

Last Updated: Friday, January 6, 2012, 16:22

मोटरसायकल निर्माती रॉयल एनफिल्डने दिल्लीच्या ऍटो एक्स्पोमध्ये ५०० सीसी बाईक थंडरबर्ड ५०० चे अनावरण केलं. येत्या वर्षाच्या अखेरीस थंडरबर्ड बाजारात उपलब्ध होणार आहे. कंपनीने अजून थंडरबर्डची किंमत किती असेल ते जाहीर केलेलं नाही.

ह्युंदाईची नवी एमपीव्ही हेक्सा स्पेस

Last Updated: Thursday, January 5, 2012, 21:04

ह्युदाईने दिल्लीच्या ११ व्या ऍटो एक्स्पोमध्ये नवी मल्टी पर्पज वेहिकल हेक्सा स्पेसचे अनावरण केलं. कंपनीने फेब्रुवारी अखेर लँच करण्यात येणारी नवी सोनाटाही लोकांसमोर सादर केली. आम्ही पहिल्यांदाच नव्या संकल्पनेवर आधारीत मल्टी पर्पज वेहिकल हेक्सा स्पेस दाखवत आहोत आणि ही बाजारात कधी दाखल होईल ते सांगता येत नाही

भारत बनविणार महासुपर संगणक

Last Updated: Saturday, January 7, 2012, 13:34

संगणक क्षेत्रात भारताचे दमदार पाऊल पडले आहे. आता तर सुपर कम्प्युटरच्या कैक पटीने मजल मारणारा महासुपर संगणक ('एक्झाफ्लॉप' ) तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यातील माहिती-तंत्रज्ञानाचा चेहरामोहरा बदलू शकणार आहे.

आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे...

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 16:06

परम जग्गी, विवेक नायर, विकास मोहिंद्रा, कुणाल शहा, मनीत अहुजा, राज कृष्णन, सिद्धांत गुप्ता, निखील अरोरा आणि मनवीर निझर यांची नावं तुम्ही ऐकली असण्याची शक्यता कमीच. पण हे आहेत उदयाचे उगवते तारे. फोर्ब्सने भविष्यात दमदार वाटचाल आणि प्रभावी कामगिरी करतील अशा ३० वर्षाखालील ३६० जणांची यादी संकलीत केली आहे त्यात या नावांचा समावेश आहे.

वास्तूशास्त्राविषयी मार्गदर्शन शिबीर

Last Updated: Thursday, December 8, 2011, 17:39

मुलुंडच्या कालीदास नाट्यगृहात वास्तूविराज डॉ. रवीराज अहिरराव यांनी वास्तूशास्त्राविषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित केलं होतं.

पार्ले महोत्सव जोषात...

Last Updated: Monday, November 28, 2011, 07:07

पार्ले महोत्सव लाखो दिलो की धडकन, कारण की वर्षभर या महोत्सवाची पार्लेकर अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत असतात. कारण की हा महोत्सव म्हणजे याचं हक्काचं व्यासपीठ असतं.

'भारतबेरी'ची 'ब्लॅकबेरी'ला टक्कर

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 07:40

'ब्लॅकबेरी'ला आता पूर्णपणे स्वदेशी 'भारतबेरी'ची टक्कर राहणार आहे.

भारतीय मोठ्या प्रमाणावर जाळ्यात (इंटरनेटच्या हो)

Last Updated: Friday, November 11, 2011, 17:28

भारतात २०१४ पर्यंत नेटचा वापर करणाऱ्यांची संख्या ३०० दशलक्षांवर जाऊन पोहचेल अशी गुगलचा अंदाज आहे. सध्या भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या १०० दशलक्ष आहे त्यात तिप्पट वाढ होणं अपेक्षित असल्याचं गुगलचे कंट्री हेड राजन आनंदन यांनी द वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितलं.