जगातील सर्वांत वृद्ध पुरूषाचं निधन

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 17:12

जपानमध्ये राहाणारे जगातील सर्वात वृद्ध नागरिक जिरोउमन किमुरा यांचे आज निधन झालं. ते ११६ वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांना ‘जगातील सर्वांत जास्त जगणारे पुरूष’ हा सन्मान मिळाला होता.

जगातला प्रत्येक सातवा व्यक्ती उपाशी!

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 16:40

जगभरात प्रत्येक दिवशी २० हजार मुलांच्या पोटात अन्नाचा कणही जात नाही आणि ते भूकेला बळी पडतात. दरवर्षी १ अब्ज ३० कोटी टन खाद्य पदार्थाची नासाडी होते आणि जगातील प्रत्येक सातवा व्यक्ती उपाशी झोपतो... ही सत्य परिस्थिती नुकतीच एका अहवालाच्या माध्यमातून प्रकर्षानं समोर आलीय.

सिंगापूरमध्ये दोघा भारतीयांचा वेश्या व्यवसाय

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 16:43

परदेशात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघा भारतीयांना सिंगापूर पोलिसांनी अटक केलीय. वेश्या व्यवसाय करण्यासंबधीच्या गुन्ह्याबद्दल भारतीय जुळ्या भावंडांना साडेतीन महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बांग्लादेशात हिंदूंसाठी नवा कायदा!

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 16:01

बांग्लादेश कॅबिनेटनं हिंदू धार्मिक संपत्तीचा विकास तसंच या संपत्तीचा बेकायदेशीर गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी एका नव्या कायद्याला मान्यता दिलीय. कॅबिनेटनं या कायद्याच्या अंतिम मसुद्याला मान्यता दिलीय.

तो झोपला की-बोर्डवर, ३० कोटी डॉलर्स झाले ट्रान्सफर!

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 15:54

बँक कर्मचाऱ्याला काम करता करता डुलकी लागली. आणि की-बोर्डवरच तो कर्मचारी झोपी गेला. त्यामुळे की- बोर्डवरील काही बटनं चुकून दाबली गेली आणि सुमारे ३० कोटी डॉलर्सची अमाउंट दुसऱ्याच अकाउंट ट्रान्सफर झाली.

भाव एक रुपया! पाक, दुबईतील फोन्स बंद

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 10:39

सट्टेबाजीमुळे क्रिकेट विश्व ढवळून निघाले. दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी सट्टेबाजांना पकडण्यास व्युहरचना केली. काही हाती लागले तर काही भूमिगत झाले. त्यांचा कारनामा सुरूच होता. पाकिस्तान आणि दुबईमार्फत सट्टा लावला जात होता. मुंबईत पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचच्या टीम काळबादी येथे फिल्डिंग लावली. मात्र, त्याने भाव एक रूपया, असे म्हणताच पाक, दुबईतील फोन क्षणात बंद झालेत.

हिटलरच्या सहकाऱ्याच्या डायरीत काय दडलंय?

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 15:55

जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर हा वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्याच्या जवळच्या सहकाऱ्याची डायरी सापडलेय. या डायरीत काय दडलंय, याची तपासणी करण्यासाठी डायरी हस्तगत करण्यात आलेय.

मोदींची पंतप्रधानपदाकडे घोडदौड... जगभरात खळबळ!

Last Updated: Monday, June 10, 2013, 16:17

रविवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचाराची धुरा संभाळण्यास दिली गेली. या गोष्टीमुळे केवळ काँग्रेस व इतर भारतीय राजकीय पक्षांमध्येच नव्हे, तर जगभरातील राजकीय विश्लेषकांमध्ये खळबळ उडाली आहे.

नेल्सन मंडेला पुन्हा हॉस्पीटलमध्ये

Last Updated: Saturday, June 8, 2013, 18:37

वर्णभेदाविरुद्धच्या मोहिमेचे प्रणेते तसेच दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना शुक्रवारी रात्री उशीरा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

तो `तो` नव्हे तर `ती` असल्याचं ६६ वर्षांनंतर सिद्ध!

Last Updated: Thursday, June 6, 2013, 15:44

तब्बल ६६ वर्षानंतर मात्र त्याला त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रचंड धक्का सहन करावा लागलाय. कारण, डॉक्टरांनी तो एक पुरुष नसून स्त्री असल्याचा दाखलाच त्याला दिलाय.