अभिनेता अभिषेक बच्चनची खंत, Actor Abhishek Bachchan Khant

अभिनेता अभिषेक बच्चनची खंत

अभिनेता अभिषेक बच्चनची खंत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असलो तरी त्यांच्यासारखे उत्तुंग यश आपल्याला मिळू शकलेले नाही. आपण त्यांच्या यशाशी बरोबरी करू शकलेलो नाही, अशी खंत अभिषेक बच्चन याने आज व्यक्त केली.

‘धूम- ३’ या २० डिसेंबरला प्रदर्शित होणार्या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका मुलाखतीत तो बोलत होता. आजघडीला ७१ .वर्षांचे असतानाही डॅड आपल्यापेक्षा जास्त व्यस्त असल्याचे सांगून अभिषेक म्हणाला त्यांचा मुलगा म्हणून प्रेक्षकांनी मला स्वीकारले त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

युवा, बंटी और बबली, गुरू असे यशस्वी चित्रपट देऊनही वडिलांच्या स्टारडमला आपण स्पर्शही करू शकलो नाही, असेही त्याने सांगितले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 18, 2013, 19:45


comments powered by Disqus