ऐकलंत का... आता होऊ शकतं गर्भाशय प्रत्यारोपण!

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 16:16

स्वीडनमध्ये नऊ महिलांवर गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, या महिला लवकरच गर्भवती होण्याची आशा बाळगून असल्याचं ही वैद्यकीय किमया साध्य करणार्यान चमूच्या प्रमुख डॉक्टरांनी जाहीर केलंय.

श्रीहरिकोटावरून जीसॅट-14 उपग्रहासह जीएसएलव्ही डी-5 चं यशस्वी उड्डाण

Last Updated: Sunday, January 5, 2014, 20:13

भारताच्या जीसॅट-14 उपग्रहाचं आज श्रीहरिकोटावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरवरुन हा उपग्रह आकाशात झेपावला. जीसॅट-14 जीएसएलव्ही इन्सॅट डी-5 प्रक्षेपक 1980 किलो वजनाचा आहे. सायंकाळी ४ वाजून १८ मिनिटांनी हे उड्डाण करण्यात आलं.

फ्रान्समध्ये जगातील पहिलं कृत्रिम हृदयरोपण यशस्वी!

Last Updated: Monday, December 23, 2013, 09:20

जगात पहिल्यांदाच फ्रान्समध्ये एका ७५ वर्षीय पुरुषावर यशस्वीपणे कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलंय. या शस्त्रक्रियेमुळं या वयोवृद्ध रुग्णाचं आयुष्य पाच वर्षांनी वाढविण्यात डॉक्टरांना यश मिळालं.

अभिनेता अभिषेक बच्चनची खंत

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 19:45

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असलो तरी त्यांच्यासारखे उत्तुंग यश आपल्याला मिळू शकलेले नाही. आपण त्यांच्या यशाशी बरोबरी करू शकलेलो नाही, अशी खंत अभिषेक बच्चन याने आज व्यक्त केली.

पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी!

Last Updated: Monday, October 7, 2013, 11:46

भारताच्या पृथ्वी-२ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची ओडिशामधील चंडीपूर इथल्या तळावरून यशस्वी चाचणी करण्यात आलीय. पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर हल्ला करणारं क्षेपणास्त्र असून ३५० किमीच्या पट्ट्यात ते मारा करू शकतं.

सर रवींद्र जडेजा सर्वात यशस्वी गोलंदाज

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 16:37

तिरंगी मालिका आणि चँम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयानंतर रवींद्र जडेजा टीम इंडियाचा हिरो बनला आहे. तसेच या वर्षातील त्याच्या कामगिरीवर नजर टाकली असता तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

जीवनातील संकटांचा सामना करण्यासाठी...

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 08:30

आयुष्यातील खाच-खळगे समजावून घेऊन त्यापासून मार्ग काढणारा व्यक्ती जीवनात यशस्वी होतो. पण, हे खाच-खळगे समजणार तरी कसे?

कोणतंही काम यशस्वी होण्यासाठी हे कराच...

Last Updated: Thursday, May 9, 2013, 11:34

सुरुवात चांगली असेल तर आपले कामही योग्य पद्धतीने पूर्ण होते. यामुळे कधीही घराबाहेर पडताना काही परंपरागत गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जसे की, घरातून बाहेर पडताना उजवा पाय आधी बाहेर ठेवावा.

कृत्रिम किडनीचं वरदान!

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 10:17

होय, हे सत्य आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेतच कृत्रिम किडनी तयार केलीय. प्रयोग म्हणून त्यांनी ही किडनी जनावरांमध्येही प्रत्यारोपण करून पाहिली आहे.

प्रेमात यश मिळत नसेल तर करा हे उपाय...

Last Updated: Friday, March 29, 2013, 07:45

तारुण्यात पदार्पण करताच तरुण-तरुणींमध्ये एक प्रकारचे आकर्षण तयार होते. कधी-कधी या आकर्षणाचेच रुपांतर प्रेमात होते.

राज सभेला गर्दी होते म्हणून यशस्वी नाही होणार- तटकरे

Last Updated: Saturday, March 2, 2013, 19:04

राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. केवळ सभांना गर्दी होते म्हणजे यशस्वी झालो, असं होत नसल्याचं तटकरेंनी म्हटलं आहे.

PSLV C-२१चे यशस्वी उड्डाण

Last Updated: Sunday, September 9, 2012, 13:49

इस्रोचं अंतराळात १००वं स्पेस मिशन असलेलं भारताच्या मिशन मंगळला सुरुवात झालीय. मंगळावर पाण्याचा शोध घेण्यासाठी PSLV C-२१ आज सकाळी ९ वाजून ५१ मिनीटांनी अवकाशात झेपावलंय.

'मंगळ'स्वारी यशस्वी, जीवसृष्टीचा शोध सुरू

Last Updated: Monday, August 6, 2012, 11:33

नासाची मंगळस्वारी थोड्याच वेळापूर्वी यशस्वी झाली आहे. नासाचे क्युरोऑसिटी रोव्हर यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास शोध घेण्याच्या उद्देशानं नासानं पाठवलेलं क्युरोऑसिटी ही रोव्हर गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं आहे.

राजनी सोडला नि:श्वास, शस्त्रक्रिया यशस्वी

Last Updated: Friday, July 20, 2012, 14:00

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर यशस्वीरित्या अँन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. अँजिओप्लास्टीनंतर बाळासाहेबांनी उद्धव यांची फोनवरून विचारपूस केली. उद्धव यांना रविवारपर्यंत डिस्चार्ज दिला जाऊ शकतो अशी माहिती आहे.

मी येतोय... युवी टी-२० वर्ल्डकप खेळणार?

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 20:08

सिक्सर किंग युवराज सिंग त्याच्या चाहत्यांना टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळतांना पाहता येण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी संभाव्य 30 प्लेअर्सची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता असून यामध्ये युवीची निवड जवळपास निश्चित मानली जाते आहे.

भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Last Updated: Thursday, April 26, 2012, 09:14

अंतरीक्ष अभियानात इस्त्रोनं आणखी भरारी घेतली आहे. श्रीहरीकोटा इथून ' रिसॅट- 1' या उपग्रहाहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या कामगिरीबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी इस्त्रोचे अध्यक्ष के राधाकृष्णन यांचे दूरध्वनीवरून खास अभिनंदन केले आहे.

कोयनेत यशस्वी लेक टॅपिंग

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 12:31

कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार पाहायला मिळाला. केवळ आठ सेकंदात पाण्यातच्या खाली स्फोट घडवून आणण्यात आला. त्यामुळे जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यात अभियंते यशस्वी झाल्याने इतिहासातील हे सोनेरी पान लिहिले गेले आहे.

अग्निपंख

Last Updated: Saturday, April 21, 2012, 10:01

गुरुवारी अग्नी - 5 या क्षेपणास्त्राची गुरुवारी चाचणी यशस्वी झाली आणि अर्धं जग भारताच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आलं. अग्नी -5 चा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. अवघ्या 20 मिनिटात पाच हजार किलोमिटर अंतर पार करण्याची क्षमता अग्नी -5मध्ये आहे.

'अग्नी - ५' यशस्वीपणे आकाशात झेपावलं

Last Updated: Thursday, April 19, 2012, 09:28

भारताच्या महत्वाकांक्षी अणवस्त्रवाहू अग्नि - ५ क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. आज पहाटे ओरिसातल्या व्हीलर्स बेटावरून अग्नि - ५ क्षेपणास्त्र आकाशात झेपावलं.

अमिताभ यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

Last Updated: Saturday, February 11, 2012, 16:07

हिंदी चित्रपट सृष्टीतील बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर आज यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. याबाबतची माहिती त्यांच्या डॉक्टरांनी दिली. अमिताभ (६९) गेल्या काही वर्षांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत.

मुलाची हूल, निवडणुकीतून गूल; म्हणे, 'डॉक्टरचीच भूल'!

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 07:59

महेंद्र दुधे निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारीही सुरू केली होती. मात्र तिसरं अपत्य झाल्यानं त्यांची गोची झाली, तेव्हा तिसऱ्या अपत्याचं खापर त्यांनी चक्क डॉक्टरवरच फोडलंय.

पोलिसांनी लावली प्राणांची बाजी

Last Updated: Sunday, November 13, 2011, 11:18

पुणे पोलिसांनी ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पुन्हा जेरबंद केलं. मात्र आरोपीला पुन्हा पकडताना तीन पोलीस गंभीर जखमी झाले. सिद्धराम बंगलुरे या आरोपीला विजापूर कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस पुण्याला परतत होते.