‘चेन्नई एक्स्प्रेस’नं ‘३ इडियट्सला’ उडवलं , `Chennai Express` becomes Bollywood`s biggest grossing film

‘चेन्नई एक्स्प्रेस’नं ‘३ इडियट्सला’ उडवलं

‘चेन्नई एक्स्प्रेस’नं ‘३ इडियट्सला’ उडवलं
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

बादशहा शाहरुख खान पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशहा ठरलाय. शाहरुख-दीपिकाच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’नं बॉक्स ऑफिसवर धूम माजवत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलाय.

अभिनेता आमीर खानच्या ‘३ इडियट्स’ला ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या इंजिनानं जोरदार धडक दिलीय. ‘३ इडियट्स’नं २०२.४७ कोटी रुपयांची कमाई केली होती. मागील चार वर्षात बॉलिवूडमधली सर्वात जास्त कमावणारी फिल्म म्हणून ‘३ इडियट्स’चं स्थान कायम होतं. मात्र यंदा ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’नं हा रेकॉर्ड मोडत आतापर्यंत तब्बल २०२.६७ कोटींची कमाई केलीय.

रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच असतात, चेन्नई एक्स्प्रेसनं हेच केलंय आणि हिंदी सिनेमा म्हणजेच बॉलिवूडचा सगळ्यात जास्त कमावणार चित्रपट बनण्याचा मान त्यानं मिळवलाय, असं बॉक्स ऑफिसचे अभ्यासक तरण आदर्शनं यांनी “ट्वीट”द्वारं म्हटलंय.

सलमान खानचा चित्रपट ‘एक था टायगर’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडल्यानंतर अवघ्या २४ तासांतच शाहरुखनं आमीरला पण मागं टाकलंय. ७० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या चेन्नई एक्स्प्रेसनं आतापर्यंत १७० टक्के नफा कमावलाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 26, 2013, 12:24


comments powered by Disqus