जॉनच्या ‘मद्रास कॅफे’ला विरोध! , Mumbai : Tamil civilian protest Against Madras Cafe

जॉनच्या ‘मद्रास कॅफे’ला विरोध!

जॉनच्या ‘मद्रास कॅफे’ला विरोध!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मद्रास कॅफे’ सिनेमाला तामीळ भाषिकांनी जोरदार विरोध दर्शवलाय. मुंबई भाजपच्या नेतृत्वाखाली सायन सर्कल इथं आज रास्तारोको आणि जोरदार घोषणा देत निदर्शनही करण्यात आलंय.

सिनेमाची पोस्टर्स फाडत आपला विरोध तामीळ भाषिकांनी दर्शविला. अभिनेता जॉन अब्राहमची निर्मिती असलेला `मद्रास कॅफे` हा चित्रपट भारताची गुप्तचर यंत्रण रिसर्च अँड अॅनालिसीस विंग (रॉ)च्या कार्यपद्धतीवर आधारीत आहे. श्रीलंकेतील १९९०ची अंतर्गत बंडाळी आणि त्यातील भारताची भूमिका हा चित्रपटाचा मुख्य विषय आहे. श्रीलंकेच्या हल्ल्यात मारला गेलेला प्रभाकरन यांची व्यक्तिरेखा यात नकारात्मक दाखविण्यात आली आहे. तसंच तामिळी संघटनांना उल्लेख चित्रपटात दहशतवादी असा करण्यात आल्यामुळं तामीळ संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला आहे.

मात्र, सिनेमात असा कोणताही उल्लेख नसल्याचंही दिग्दर्शक सुजीत सरकार आणि अभिनेता जॉन अब्राहमचं म्हणणं आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणणारा एलटीटीईचा प्रमुख प्रभाकरन याची व्यक्तिरेखा नकारात्मक दाखविणाऱ्या `मद्रास कॅफे` या आगामी सिनेमाला भाजपनंही विरोध दर्शवलाय. या चित्रपटामुळं तामिळ भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्यात, त्यामुळं चित्रपटावर तत्काळ बंदी घालण्याची मागणी भाजपनं केलीय.

`मद्रास कॅफे` हा चित्रपट उद्या रिलीज होणार आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 22, 2013, 13:24


comments powered by Disqus