सलमान वांद्राच्या घरी आणणार नाही गणपती!, Salman`s Bandra don`t Ganesha to home

सलमान वांद्राच्या घरी आणणार नाही गणपती!

सलमान वांद्राच्या घरी आणणार नाही गणपती!
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

अभिनेता सलमान खानच्या वांद्राच्या घरी यंदा गणरायाचं आगमन होणार नाही. गेले ११ वर्ष सलमानची बहीण अर्पिता वांद्र्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणरायाचं स्वागत करायची. मात्र यावर्षी वांद्राच्या घरी रिन्यूवेशन होत असल्यामुळे आणि ते काम वेळेत पार पडत नसल्यामुळे येथे गणरायाला आणले जाणार नाही.

वांद्रा ऐवजी सलमानच्या रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या फॉर्म हाऊसवर गणरायाचं आगमन होणार असल्याचं म्हटलं जातंय. याचा निर्णय लवकरच सलमानची पूर्ण फॅमिली एकत्रित घेणार असल्याचं त्यांच्याकडूनच सांगण्यात आलं आहे. तसंच यंदाच्या गणपतीची मूर्ती ही इको फ्रेन्डली असणार आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
Your Comments
Post Comments