Last Updated: Thursday, August 22, 2013, 14:45
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं अमिताभ बच्चन म्हणत असल्याचा एक व्हीडिओ यूट्यूवर झळकला. मात्र हा व्हिडिओ फेक आहे. त्यावर बिग बीनं आपली तीव्र नाराजी व्यक्त केलीये.
२००७ सालच्या कॅम्पेनमधली दृष्य आणि आवाजाची नक्कल करून हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचं बिग बीनं आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केलंय. तर नरेंद्र मोदी यांनीही यावर संताप व्यक्त करत हा व्हिडिओ तयार करणा-यानं बच्चन यांची माफी मागवी, असं म्हटलंय. मोदी यांनी ट्विटरवर आपली ही प्रतिक्रिया व्यक्त केलीये.
अमिताभ हे गुजरातचे ब्रँड अम्बेसिडर आहेत. बिग बीट यांनी ट्विट केलंय, मी २००७ मध्ये एक व्हिडीओ तयार केला होता. त्याच व्हिडीओची नक्कल करत नरेंद्र मोदींचा प्रचार करणारा हा व्हिडीओ बनविण्यात आला आहे. या व्हिडीओतून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीचं समर्थन करत आहे, असा अर्थ होतो. हे सर्व, बनावट, बनावट, बनावट आहे. या प्रकाराने मी नाराज आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Thursday, August 22, 2013, 14:05