Last Updated: Sunday, May 19, 2013, 17:23
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसंजय दत्तला अंडासेलमध्ये कोणताही त्रास नसल्याची माहिती त्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी दिलीय. मर्चंट यांनी काल संजयची तुरुंगात भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते.
संजय दत्त अंडासेलमध्ये बेचैन आहे, दिवस-रात्र याबाबत काहीच समजत नसल्यानं त्याला रडू कोसळलं होतं अशा बातम्या समोर आल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर त्याच्या वकीलांची ही प्रतिक्रीया महत्तवाची मानली जातेय. दरम्यान संजयची पत्नी मान्यता आणि बहिण प्रिया यांनी संजयची भेट घेतली.
संजय दत्तला इतक्यात आर्थर रोड कारागृहातून इतक्यात हलवणार नसल्याची माहिती सुत्रांनी झी मीडियाला दिलीय. गेल्या काही दिवसांपासून संजय दत्तला कुठल्या जेलमध्ये ठेवणार याबाबत शक्याशक्याता व्यक्त करण्यात येत होत्या.
संजय दत्तचा मुक्काम अजूनही आर्थर रोड जेलमध्येच आहे.
संजय दत्तला इतक्यात हलवणार नसल्याची माहिती सुत्रांनी झी मीडियाला दिलीय. दरम्यान तुरुंग पोलीस महासंचालक स्वाती साठे यांनी आज सकाळी आर्थर रोड तुरूंगाची पहाणी केली आणि संजय दत्तच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, May 19, 2013, 17:23