Last Updated: Monday, May 20, 2013, 15:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसध्या ऑर्थर रोड जेलमध्ये असणाऱ्या संजय दत्त याने आपल्याला दुसऱ्या अंडा सेलमध्ये हलवण्याची मागणी वकिलामार्फत केली होती. या आधी त्याला अजमल कसाबचं वास्तव्य असणाऱ्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
१६ मे रोजी टाडा न्यायालयाने संजय दत्तची रवानगी मुंबईतील ऑर्थर रोड जेलमध्ये केली होती. संजय दत्तला ज्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं, त्याच अंडा सेलमध्ये या आधी २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार दहशतवादी अजमल कसाब याला ठेवण्यात आलं होतं. गेल्या वर्षी कसाबला फाशी देण्यात आलं होतं. संजय दत्तला या अंडा सेलमध्ये ठेवल्यावर संजय दत्त अस्वस्थ झाला होता. त्याला कसाबच्या अंडा सेलमध्ये गुदमरू लागलं होतं. अखेर त्याने आपल्या वकिलामार्फत टाडा न्यायालयाकडे दुसऱ्या अंडा सेलमध्ये हलवण्याची मागणी केली. ही मागणी तोंडीच करण्यात आली होती.
टाडा कोर्टाने संजय दत्तची रवानगी दुसऱ्या अंडा सेलमध्ये केली आहे. कसाबचं वास्तव्य असणाऱ्या जेलमध्ये संजय दत्तला गुदमरत असल्याचं त्याच्या कुटुंबियांचं आणि वकिलाचं म्हणणं आहे. यापूर्वीही २६/११ मुंबई हल्ल्यातील सुत्रधार डेव्हिड हेडलीला ऑर्थर रोड जेलमध्ये कसाबचं भूत दिसल्याचं त्याने म्हटलं होतं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, May 20, 2013, 15:54