Last Updated: Thursday, May 16, 2013, 17:31
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेता संजय दत्त अखेर टाडा कोर्टात हजर झाला. संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्याला शरण होण्याची मुदत दिली गेली होती. शरण होण्यापूर्वी संजय दत्त प्रचंड अस्वस्थ झाला होता. तुरुंगात जायच्या कल्पनेने त्याला ताप भरला होता.
संजय दत्तला पाच वर्षांची कारावासाची शिक्षा सुप्रीम कोर्टाने सुनावली आहे. आधी १८ महिने शिक्षा भोगलेली असल्यामुळे त्याला साडेतीन वर्षंच शिक्षा भोगावी लागणार आहे. मात्र पुन्हा जेलमध्ये जाण्याच्या कल्पनेने संजय दत्त प्रचंड घाबरला होता. यापूर्वीही मीडियाशी बोलताना संजय दत्त बहिणीच्या खांद्यावर डोकं ठेवून सर्वांसमोर रडला होता. काल रात्रीही संजय दत्तला ताप भरला होता. रात्रभर त्याची पत्नी मान्यता त्याच्याजवळ बसून होती. सतत येणाऱ्या फोन कॉल्सने वैतागून संजय दत्तचा मोबाइल बंद ठेवण्यात आला होता. संजय दत्त या आधी अमेरिकेमध्ये असणाऱ्या आपल्या मुलीशी बोलला.
सकाळीही संजय दत्तच्या घरी पूजा करण्यात आली. संजय दत्तने आज सकाळी होम हवन केला. यावेळी अनेक सेलिब्रिटी त्याला भेटायला घरी आले होते. अखेर संध्याकाळी त्याला अटक करण्यात आलं
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, May 16, 2013, 17:31