Last Updated: Friday, May 17, 2013, 21:10
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई संजय दत्तला आर्थर रोडच्या १२ नंबरच्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलंय. याअगोदर या सेलमध्ये २६/११च्या हल्ल्यातला दहशतवादी अजमल कसाब याला ठेवण्यात आलं होतं.
संजयला या बराकीतून दिवस आहे की रात्र हे देखील कळत नसल्यानं त्याला रडू कोसळतंय. त्यामुळं संजयच्या वकिलांनी संजयला दुसऱ्या सेलमध्ये हलवण्याची मागणी केलीय. तुरूंग प्रशासनानं मात्र या सेलमध्ये फॅन आणि गादीची सोय असल्याचं सांगितलंय. तसंच कसाबला ज्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, तेच अंडा सेल सर्वात सुरक्षित असल्याचं तुरुंग प्रशासनाचं म्हणण आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 17, 2013, 21:10