‘चेन्नई’साठी दुनियादारी करू नका, किंग खानला मनसे इशारा, Shah Rukh Khan, Chennai Express

शाहरूख 'दुनियादारी' करू नकोस - मनसे

शाहरूख 'दुनियादारी' करू नकोस - मनसे
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

दुनियादारी हा चित्रपट काढल्यास शाहरूख खानचा राज्यात एकही शो होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी दिला आहे.

शाहरूखच्या `चेन्नई एक्स्प्रेस`साठी दुनियादारी या मराठी चित्रपटाचा शो काढल्यास खबरदार, असा दमच मनसेनेने शाहरूख खानला दिला आहे. शाहरूखचा एकही चित्रपट राज्यात होऊ देणार नाही, असे मनसे बजावले आहे. त्यामुळे `चेन्नई एक्स्प्रेस`वरून शाहरूख आणि मनसेचा नवा वाद निर्माण झाला आहे.


सिंगल स्क्रिनवरून दुनियादारी हा सिनेमा काढू नका, अन्यथा चेन्नई एक्स्प्रेसचा एकही शो प्रदर्शित करू देणार नाही, असा दम थिएटर मालकांना मनसे चित्रपट सेनेने दिला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 31, 2013, 15:50


comments powered by Disqus