Last Updated: Wednesday, July 31, 2013, 15:49
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई राज ठाकरे यांच्यापाठोपाठ शिवसेनेनंही लेखिका शोभा डे यांना लागलीच प्रत्यूत्तर दिलंय. महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करण्याची भाषा म्हणजे `ही पेज थ्री पार्ट्यांमधली ओकारी आहे` अशा भाषेत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शोभा डे यांना सुनावलंय.
आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन करताना तेलंगणा हे नवे राज्य अस्तीत्वात आणण्यात येत आहे. तसा केंद्र सरकारने स्वतंत्र राज्य निर्मितीला हिरवा कंदील दाखविला आहे. तेलंगणा राज्यावरून मुंबई आणि महाराष्ट्र का वेगळं नको, असं शोभा डे यांचं ट्विट केलं. हे त्यांना ट्विट महागात पडण्याची शक्यता आहे.
या ट्विटवरून राजकीय प्रतिक्रिया तात्काळ उमटल्यात. शोभा डे ! घटस्फोट घेण्याइतकं हे सोपं नाही, असं राज म्हणालेत. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही जोरदार टीका केली.
First Published: Wednesday, July 31, 2013, 15:49