Last Updated: Tuesday, January 1, 2013, 19:16
www.24taas.com, मुंबईदिल्लीतल्या गँगरेप घटनेविरोधात संपूर्ण देश धुमसू लागला असताना शर्लिन चोप्रा मात्र यातून स्वतःची पब्लिसिटी करू पाहात आहे. एकीकडे आंदोलनातून विरोधक फायदा करून घेत असल्याचा आरोप होत असताना शर्लिन चोप्राही स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी वादग्रस्त ट्विट केलं आणि पुन्हा सर्वांना संताप आला.
प्लेबॉय मासिकासाठी नग्न फोटोशूट करणाऱ्या शर्लिन चोप्राने ट्विटरवर वादग्रस्त विधान केलं आहे. दिल्लीतील गँगरेप पीडित मुलीच्या मृत्यूवर आपला शोक व्यक्त करताना शर्लिने पुन्हा आपल्या निर्लज्जपणाचं जाहीर प्रदर्शन मांडलं. तिने ट्विटरवर लिहिलं, “तुम्ही माझ्यावर बलात्कार करू शकता... माझ्यावर बलात्कार केल्यानंतर भारतातील सर्व तरुणी सुरक्षित राहाणार असतील, तर मी स्वतःवर बलात्कार करवून घेण्यासही तयार आहे.”
बलिदानाचा आव आणत केलेल्या या निर्लज्ज वक्तव्यामुळे शर्लिन चोप्राचचे फॅन्सदेखील संतापले आहेत. अनेक सेलिब्रिटी मुलींच्या सुरक्षिततेसाठी आंदोलनात सहभागी होऊन रस्त्यावर उतरले आहेत. सोशल नेटवर्किंग साइटवर लोकांना सुधारण्याचं आवाहन करत आहेत. अशामध्ये शर्लिनचं ट्विट हे तिच्या प्रसिद्धीसाठी हपापलेपणाचं दर्शन घडवतं. तिच्या एका चाहत्याने तर चिडून तिला विचारलंही आहे की ‘तुला स्वतःवर बलात्कार करून घेण्याची एवढी हौस आहे?’ यावर अझून तरी शर्लिनने उत्तर दिलेलं नाही.
First Published: Tuesday, January 1, 2013, 19:16