Last Updated: Tuesday, January 1, 2013, 19:42
www.24taas.com, नवी दिल्ली
राजधानीत २३ वर्षीय तरूणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करणाऱ्या एका आरोपीच्या घराजवळ कथित स्वरूपात दोन बॉम्ब लावणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
या व्यक्तीने आरोपीच्या घराजवळ कथित स्वरूपात बॉम्ब लावला होता. फटाक्यात वापरण्यात येणारी दारू या बॉम्बमध्ये वापरण्यात आली होती. राजेश नावाचा व्यक्ती जो दक्षिण दिल्लीतील पुरम भागात राहतो. रविदास कॉलनीमधून त्याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत असणाऱ्या दोन व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाले.
या तिघांना स्थानिक लोकांनी फिरताना पाहिले होते. मात्र या तिघांनी धमकी दिली होती, की आरोपींपैक रामसिंह याचं घर बॉम्बस्फोट करून उडवून टाकू. तिघांपैकी एकाला स्थानिकांनी पकडलं तर दोघं फरार झाले. आणि एका आरोपीला पकडल्यानंतर लोकांनी पोलिसांना पाचारण केलं.
First Published: Tuesday, January 1, 2013, 14:18