जवानाची महिलेवर वाईट नजर, चालत्या ट्रेनमध्ये छेडछाड, Soldier teasing to woman in the train

महिलेची चालत्या ट्रेनमध्ये जवानाकडून छेडछाड

महिलेची चालत्या ट्रेनमध्ये जवानाकडून छेडछाड
www.24taas.com, पुणे

देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना.. सुरक्षेसाठी ज्यांच्याकडे आपण आशेने पाहतो तेच जवान महिलांवर वाईट नजर टाकत आहेत. जवानांनीच अशी वाईट नजर टाकल्यास सामान्यांनी दाद मागायची तरी कोणाकडे?

रेल्वेमध्ये जवाननं महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार घडला आहे. यशवंतपूर-जोधपूर एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. ही ट्रेन पुण्यामध्ये आल्यावर प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे जवानाबाबत तक्रार केली.

बोगी क्रमांक १२ मध्ये जवानानं महिलेशी असभ्य वर्तन केल्याचं कळताच प्रवाशांनी संताप व्यक्त केला. महिलेची छेडछाड करताच बोगीतील लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

First Published: Tuesday, January 1, 2013, 17:25


comments powered by Disqus