Last Updated: Tuesday, January 1, 2013, 16:59
www.24taas.com, नाशिकनाशिक जिल्ह्यातल्या पळसन आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आलीये. 15 कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर 14 कर्मचा-यांचं निलंबन मागं घेण्यात आलं. आदिवासी आयुक्तालयाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
मुख्याध्यापक, अधिक्षकाचं निलंबन मात्र कायम आहे. सुरगाणा तालुक्यातल्या पळसाणा आश्रमशाळेत 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं अपहरण करुन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता.. या प्रकरणी संशयितांवर पोलीस कारवाई सुरु असताना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आदिवासी विभागाच्या वतीनं 15 जणांना निलंबित करण्यात आलं होतं.
यात मुख्याध्यापकासह प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिपाई, सफाई कामगार आणि चौकीदारांचा समावेश आहे. या प्रकरणानंतर आश्रमशाळेची सुरक्षा आणि स्थायी स्वरूपाच्या कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यासंदर्भात पावलं उचलली जाणार आहेत.
First Published: Tuesday, January 1, 2013, 16:33