Last Updated: Thursday, November 7, 2013, 08:44
www.24taas.com, झी मीडिया, कोलकातासचिनच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सीरिजमध्ये सचिनचा उत्साह वाढवण्याकरता अंजली आणि अर्जुन हे मायलेकही मॅचकरता ईडन गार्डन स्टेडियममध्ये आले आहेत.
वेस्ट इंडिजविरूद्धची टेस्ट सीरिज ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची फेअरवेल टेस्ट म्हणून ओळखली जातेय. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर सुरू झालेल्या सचिनच्या १९९व्या टेस्टकरता जशी फॅन्सनी गर्दी केली आहे. तसंच या मॅचकरता सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांनीही स्टेडियममध्ये उपस्थिती लावली आहे.
मास्टर ब्लास्टरची अखेरची 200वी टेस्ट मुंबईच्या वानखेडेवर रंगणार आहे. तेव्हा तर त्याचं संपूर्ण कुटुंब आणि मित्रपरिवार स्टेडियममध्ये हजेरी लावणार आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, November 7, 2013, 08:44