सचिन रणजी सोडू नको, एमसीएची विनंतीMCA request Sachin, Please do not leave Ranji Cricket this year

सचिन रणजी सोडू नको, एमसीएची विनंती

सचिन रणजी सोडू नको, एमसीएची विनंती
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं रणजी निवृत्तीचा पुनर्विचार करावा अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून करण्यात येणार आहे. एमसीए उपाध्यक्ष रवि सावंत यांनी ही माहिती दिली.
एमसीए सचिनकडे ही मागणी करणार आहे.

सचिननं हरियाविरुद्ध ७९ रन्सची नॉटआऊट इनिंग खेळत रणजी क्रिकेटला दिमाखात अलविदा केला होता. त्यामुळंच सचिननं मुंबईकडून खेळावं अशी मागणी त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून करण्यात येणार आहे. आता सचिन याबबतीत काय निर्णय घेतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर सचिनने मुंबई क्रिकेटकडे लक्ष द्यावं अशी विनंती एमसीए करणार आहे. सचिनला मुंबईविषयी प्रेम आहे. सचिनलाही कल्पना आहे की यंदाच्या मोसमात अजित आगरकरनं निवृत्ती स्वीकारली आहे, तर रमेश पोवारनं राजस्थानकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

या सीनियर्सच्या गैरहजेरीत मुंबईच्या संघाची सध्या नव्यानं उभारणी होत आहे. अशा परिस्थितीत मुंबईला अनुभवी शिलेदाराची गरज आहे, जो फलंदाजी आणि शिस्तीचा आदर्श घालून देऊ शकतो, भवितव्याच्या दृष्टीनं मुंबईला नव्या संघाची उभारणी करायची आहे, त्यामुळं सचिननं यंदाचा मोसम तरी खेळत राहावं अशी विनंती त्याला करणार असल्याचं सावंत म्हणाले.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.


पाहा व्हिडिओ



First Published: Monday, November 4, 2013, 09:37


comments powered by Disqus