श्रीसंतच्या लॅपटॉपमध्ये काय दडलंय?, ipl fixing, ,Bollywood actress, cricket

श्रीसंतच्या लॅपटॉपमध्ये काय दडलंय?

श्रीसंतच्या लॅपटॉपमध्ये काय दडलंय?
www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली

आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये एकामागून एक धक्कादायक खुलासे होतायत. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं शुक्रवारी जप्त केलेल्या श्रीसंतच्या लॅपटॉपमध्ये काही मॉडेल्स, अभिनेत्रींचे फोटो सापडल्याची माहिती झी मिडीयाच्या सूत्रांनी दिलीय.

श्रीसंतच्या लॅपटॉपमध्ये एका मराठी अभिनेत्रीनंही प्रगती केल्याचं समजलंय. या मराठी अभिनेत्रीचे श्रीसंतसोबतचे फोटो या लॅपटॉपमध्ये सापडलेत. या लॅपटॉपमध्ये काही व्हिडीओ क्लिप्सही आढळल्याची माहिती आहे.

तसंच त्याच्या डाय-यांमध्ये अनेक मुली, अभिनेत्री, मॉडेल्सचे मोबाईल नंबर, पत्ते सापडलेत. पोलीसांनी आता या दिशेनं तपास सुरू केला असून आयपीएल स्पॉट फिक्सिंगची जत्रा आणखी किती रंग उधळणार याबाबत उत्सुकता आहे. याबाबत क्रांती रेडकरनं स्पष्टीकरण दिलय.

श्रीसंत आणि मॅच फिक्सिंग प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं तिनं म्हटलंय. मी सिंधुदुर्गमध्ये शुटींग करण्यात मग्न आहे. हे शुटींग १० मेपासून सुरू आहे. त्यामुळे यामध्ये प्रसिद्धीसाठी माझे नाव घेतलं गेलंय. मी याबाबत अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.

*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, May 20, 2013, 11:34


comments powered by Disqus