स्पॉट फिक्सिंग बॉय श्रीसंत नशेत मुलीसोबत, IPL spot-fixing: Sreesanth was drunk alcohol during arrest

स्पॉट फिक्सिंग : श्रीसंत नशेत मुलीसोबत

स्पॉट फिक्सिंग : श्रीसंत नशेत मुलीसोबत
www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली

आयपीएल-६मध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आलेला फास्ट बॉलर एस श्रीसंत नशेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यासोबत एक मुलगी असल्याचे पोलिसांनी म्हटलेय.

फिक्सिंगप्रकरणी श्रीसंतला ताब्यात घेतले त्यावेळी तो नशेत होता. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या खाली त्याची एसयुव्ही गाडी उभी होती. याच गाडीतून त्याला अटक केली. त्याच्यासोबत एक मुलगी होती, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.

ज्यावेळी दिल्ली पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी श्रीसंतने आरडा-ओरडा करण्यास सुरूवात केली. केरळ तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्या परिचयाचे आहेत. त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मला सोडा असे तो म्हणाल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, ज्यावेळी पोलिसांनी आपले ओळखपत्र दाखविल्यानंतर तो सावध झाला. त्यावेळी त्यांने आपला मोबाईल दिला आणि सांगितले माझ्या परिचयाच्या मुख्यमंत्र्यांशी बोला, अस श्रीसंत म्हणाला.

श्रीसंतला गुरूवारी सकाळी मुंबईत आयपीएल फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आले. त्याच्याबरोबर राजस्थान रॉयल्सचे दोन खेळाडू (अंकीत चव्हाण, अजित चंदेलिया) यांना अटक केली. त्यांच्यावरही फिक्सिंगचा आरोप करण्यात आलाय. आतापर्यंत १२ लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सट्टेबाजांचा समावेश आहे.

*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, May 20, 2013, 12:22


comments powered by Disqus