Last Updated: Saturday, May 25, 2013, 14:09
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
श्रीनिवासन यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा निश्चित मानण्यात येतोय. त्यामुळं त्यांच्या जागेवर आता प्रभारी अध्यक्षाची वर्णी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मी राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेत श्रीनिवासन यांनी बीसीसीआयला पेचात टाकलं आहे.
फिक्सिंगच्या गर्तेत अडकलेल्या बीसीसीआयला आता स्वच्छ प्रतिमेच्या आणि अनुभवी नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळं बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शंशाक मनोहर यांच्या नावाची चर्चा सुरू झालीय. मनोहर हे कायद्याचे जाणकार असून शरद पवारांचेही अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणाची दाट शक्यता व्यक्त केली जातेय.
आज श्रीनिवासन मुंबईत दाखल झाले आहे. त्यावेळी त्यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिलाय. मी काहीही केलेले नाही. माझा काहीही संबंध नाही, असं सांगत राजीनाम्या न देण्यावर ते ठाम राहिलेत. श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागलाय. त्यामुळेच त्यांची गच्छंती आता अटळ मानण्यात येतेय. श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्यास नकार दिलाय. मात्र चेन्नई सुपर किंग्जचा सीईओ आणि जावई मयप्पननं आयपीएलमध्ये बेटिंगची कबुली दिल्यानंतर श्रीनिवासन अधिकच अडचणीत आले आहेत. यामुळं बीसीसीआयच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहचलाय. त्यामुळं बीसीसीआयच्या पदाधिका-यांनी श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्यासाठी आग्रह धरलाय.
श्रीनिवास यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांच्या निलंबनाची तयारीदेखील सुरू असल्याचं पीटीआयच्या सुत्रांनी सांगितलंय. याचसंदर्भात बीसीसीआयची तातडीची बैठक बोलावली जाऊ शकते. श्रीनिवासन यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी 2/3 बहुमतांची आवश्यकता आहे.
श्रीनिवासन यांच्या जागेवर नवे हंगामी अध्यक्ष म्हणून बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. बीसीसीआयचे पदाधिकारी त्यांच्या संपर्कात असल्याचं समजतंय. मनोहर हे हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 25, 2013, 14:09