श्रीनिवासनच्या मुलाचा आरोप मय्यपनचे बुकींशी संबंध, Guru has links with bookies: Srinivasan`s son

श्रीनिवासनच्या मुलाचा आरोप मय्यपनचे बुकींशी संबंध

श्रीनिवासनच्या मुलाचा आरोप मय्यपनचे बुकींशी संबंध
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मय्यपनच्या अडचणीत भर पडलीये. श्रीनिवासन यांचा मुलगा अश्विन यानं मय्यपनचे बुकिंशी घनिष्ट संबंध असल्याचं सांगत त्याला घरचा आहेर दिलाय. आपल्या वडिलांचा व्यवसाय गिंळकृत करण्याचा मय्यपनचा डाव असल्याचंही त्यानं अप्रत्यक्षपणे म्हटलंय...

आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नई सुपर किंग्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मय्यपन यांच्या अडचणीत आता वाढ होत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा मुलगा अश्विन याने हा खुलासा केला आहे. मय्यपनचे दुबई आणि चेन्नईच्या बुकींसोबत संबंध आहेत. त्यामुळे मय्यपन आणि श्रीनिवासन यांना अश्विनने चांगलचं अडचणीत आणलं आहे.

झी मीडियाचा भाग असणाऱ्या डीएनएला दिलेल्या मुलाखतीत अश्विनने म्हंटले आहे, मय्यपन आयपीएल-६ सुरू होण्यापूर्वी बुकींच्या संपर्कात होता. त्याचे चेन्नई आणि दुबईच्या बुकीज सोबत सतत संपर्क असतो. आणि त्याचे हे संबंध अतिशय जुने आहेत. त्याचप्रमाणे अश्विनने मय्यपनवर गंभीर आरोपही केले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 24, 2013, 12:49


comments powered by Disqus