CSKने झटकले हात, श्रीनिवासन यांची पडणार खाट?, N Srinivasan May Land In Trouble After His Son Made Some Revealing

CSKने झटकले हात, श्रीनिवासन यांची पडणार खाट?

CSKने झटकले हात, श्रीनिवासन यांची पडणार खाट?
www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
फिक्सिंगप्रकरणात नाव अडकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सची मालकी असलेल्‍या इंडिया सिमेंट्स या कंपनीने मय्यपन यांच्यापासून हात झटकले आहेत. मय्यपन हे सीएसके संघाचे सीईओ पदावर नव्हते. ते केवळ संघ व्यवस्थापन एक सदस्य आहेत.

कोणाहीविरुद्ध पुरावे आढळल्यास कंपनीकडून कडक कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कंपनी बीसीसीआयला चौकशीमध्ये पूर्णपणे सहकार्य करणार आहे, असे कंपनीने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवेच नाट्य समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गुरुनाथ मय्यपन हे सायंकाळी ५ वाजेपर्यंत मदुराई येथेच अडकून होते. मुंबईत पंतप्रधानांचा कार्यक्रम असल्यामुळे मय्यपन यांच्या् खासगी चार्टर विमानाला उडण्याची परवानगी मिळाली नाही, अशी माहिती मिळाली.

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर रुतली आहेत, हे हळूहळू समोर येत आहे. या प्रकरणात एक मोठे नाव अडकण्याची शक्यता आहे. ते नाव म्हणजे खुद्द बीसीसीआयचे अध्येक्ष एन. श्रीनिवासन यांचे. श्रीनिवासन यांचा मुलगा अश्विन यानेच पित्यावर संशय व्यक्त केला असून बहिणीचा नवरा अर्थात गुरुनाथ मय्यपन यांच्यावरही त्याने गंभीर आरोप केले आहेत.

मय्यपन हे फिक्स‍र असून जवळपास दोन वर्षांपासून फिक्सिंगमध्ये गुतले असल्याचा खुलासा अश्विन श्रीनिवासन याने केला होता. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे श्रीनिवासन यांच्या अडचणी वाढू शकतात.

मुलानेच आरोप केल्यानंतर आज नवी दिल्लीत बीसीसीआयचे वरीष्ठ पदाधिकारी अरूण जेटली आणि आयपीएल कमिशनवर राजीव शुक्ला यांनी आज बैठक घेतली. त्यांनी विविध कायदेशीर मुद्यांवर चर्चा केली. तसेच कायदा मंत्री कपिल सिब्बल यांच्या सोबतही त्यांनी चर्चा केली.

आज गुरुनाथ मय्यपन यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले आहे. मय्यपन यांना अटक झाल्यास बीसीसीआय अध्यक्षांवर कारवाई होण्याची शक्यता असून ते बडतर्फ होऊ शकतात. मय्यपन हे श्रीनिवासन यांचे अतिशय जवळचे नातेवाईक आहे. त्यामुळे श्रीनिवासन अडचणीत येऊ शकतात.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 24, 2013, 18:27


comments powered by Disqus