कोहलीनं मोडला सेहवागचा रेकॉर्ड; भारताचा विजय, Virat slams 52-ball 100 against Australia

कोहलीनं मोडला सेहवागचा रेकॉर्ड; भारताचा विजय

कोहलीनं मोडला सेहवागचा रेकॉर्ड; भारताचा विजय

www.24taas.com, झी मीडिया, जयपूर

जयपूरमध्ये टीम इंडियाने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. ३६० रन्सच्या सर्वाधिक मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना टीम इंडियाने कांगारुंवर नऊ विकेट्सने दणदणीत विजय साकारला.

विराट कोहली आणि रोहित शर्माची तडाखेबंद सेंच्युरी आणि शिखर धवनच्या धमाकेदार इनिंगच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला. या विजयाबरोबरच टीम इंडियाने सीरिजमध्ये १-१- ने बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ३६० रन्सच्या विशाल आव्हानाच पाठलाग करताना शिखर धवन आणि रोहित शर्माने १७६ रन्सची दमदार ओपनिंग देत विजयाचा पाया रचला. धवन ९५ रन्सवर दुर्देवाने आऊट झाला. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने सेंच्युरी झळकावत भारताला विजय मिळवून दिला.

कोहलीने ५२ बॉल्समध्ये झुंजार सेंच्युरी झळकावत सेहवागचा रेकॉर्ड मोडित काढला. सेहवागनंतर भारताकडून वेगवान सेंच्युरी झळकावण्याचा मानही कोहलीने पटकावला. तर, नॉट आऊट १४१ रन्सची इनिंग खेळणाऱ्या रोहित शर्माला `प्लेअर ऑफ द मॅच`ने गौरवण्यात आलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 16, 2013, 22:16


comments powered by Disqus