बरं का, सचिनचाही एक बॉस आहे !, Sachin Tendulkar is a boss !

बरं का, सचिनचाही एक बॉस आहे !

बरं का, सचिनचाही एक बॉस आहे !
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वाचा बॉस आहे. मात्र सचिनचाही एक बॉस आहे ! ऐकून आश्चर्य वाटल ना.विशेष म्हणजे सचिन आपल्या बॉसला सिक्स मारायला शिकवतो...चला तर मग पाहूयात मास्टर-ब्लास्टरचा बॉस कोण आहे ते.

सचिन तेंडुलकरची महती आपण सारेचजण नेहमीच ऐकत असतो. सचिनची बॅटिंग, रन्सचा वर्षाव, रेकॉर्डस, त्याचा नम्र स्वभाव, शालिन चारित्र्य, आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श पिता आणि एक आदर्श नागरिक या सा-याबाबत आपण नेहमीच काही ना काही ऐकत असतो आणि पाहत असतो...आदर्श आणि एक जबाबदार नागरिक असल्याची त्याची झलक पुन्हा एकदा सा-यांसमोर आली आहे. कारण सचिनने आपल्या एका स्पेशन चाहत्याला बॅटिंग कशी करायची हे शिकवलय. हाच तो सचिनचा स्पेशल चाहता.

कोलकात्यात राहणारा हा बावीस वर्षीय चाहता अपंग आहे. सचिन आणि त्याची भेट कोलकात्यातील एका हॉटेलमध्ये झाली.विशेष म्हणजे ज्या दिवशी सचिनचा ४०वा वाढदिवस होता त्या दिवशी सचिनने आपल्या या स्पेशल चाहत्याला बॅटिंगच्या टिप्स देऊन आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी हॉटेलमधील स्टाफनेही आनंदाने सचिनला बॉलिंग केली. क्रिकेटविश्वात सचिन हा सा-यांच बॉस आहे. मात्र सचिनसाठी त्याचा हा स्पेशल चाहता बॉस आहे !

या चाहत्याच नाव हर्षूल गोएंका आहे मात्र मास्टर-ब्लास्टरला त्याला बॉस म्हणायला आवडत...म्हणूनच कोलकात्यातील हा बावीस वर्षीय चाहता सचिनचा बॉस बनला आहे असच म्हणाव लागेल. मास्टर-ब्लास्टरचा डाय हार्ट फॅन असलेल्या या `बॉस`ने कोलकाता इथंल्या सचिनच्या १९९व्या टेस्टलादेखील स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. सचिनसाठी हा युवक बॉस बनल्याने आता हा बॉसच सेलिब्रेटी बनला आहे. म्हणूनच सचिनच्या या बॉसचं शाहरुख खान, ब्रेट ली, गौतम गंभीर आणि सौरव गांगुलीनेदेखील कौतुक वाटतय. या चाहत्याशी सचिनचं नातं पाहिल की सचिनमधील एक जबाबदार आणि दयाळू माणसाची झलकही आपल्याला पाहायला मिळते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 13, 2013, 15:09


comments powered by Disqus