निरोप : सचिनच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या

Last Updated: Sunday, November 17, 2013, 12:26

क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक असणारा सचिन तेंडुकलर आज भावूक झाला. २००वी कसोटी त्याची अखेरची होती. त्यांने आपला नैसर्गिक खेळही या कसोटीत करताना ७४ धावा कुटल्या. यामध्ये १२ फोर लगावलेत. हाच सचिन भारताने सामना जिंकल्यानंतर भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रु आलेत. प्रेक्षकांची दोन्ही हात उंचावून मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांने मैदानावर सर्वांचे आभार मानताना काही क्षण थांबला. काय बोलावे तेच समजेत नव्हते. त्याला दाटून आले....डोळ्यांच्या कडा पाणावल्या...त्यानंतर सचिन बोलला.

सचिनच्या मनातील क्रिकेट कसे काढणार? - अंजली

Last Updated: Saturday, November 16, 2013, 20:14

वानखेडे स्टेडियमवरील फॅन्सचं प्रेम पाहून मास्टर ब्लास्टर सचिनही भारावला. त्याच्या डोळ्यातही अश्रू तरळले.. तर सचिनची पत्नी अंजलीलासुद्धा भावना आवरणं कठीण झालं होतं. सचिनविना क्रिकेट शक्य आहे. मात्र क्रिकेटविना सचिन ही कल्पना करुच शकत नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया तिनं दिलीय.

सचिन तेंडुलकरला द्या, खास शुभेच्छापर प्रतिक्रिया...

Last Updated: Saturday, November 16, 2013, 12:32

मुंबईचा लाडका सचिन. क्रिकेटचा देव. मास्टर. मास्टर ब्लास्टर. बॉलरचा कर्दनकाळ. अनेक विक्रम आपल्या पायाजवळ आणले. सचिनची २००वी कसोटी. तीही शेवटची. पुन्हा सचिन आपल्याला मैदानावर दिसणार नाही. त्याला निरोप देताना चाहते भावूक झाले.

टीम जिंकली...पण सचिनच्या डोळ्यात पाणी

Last Updated: Saturday, November 16, 2013, 14:01

तिसऱ्या दिवशी पहिली विकेट ख्रिस गेलची विकेट पडली त्याचवेळी वेस्ट इंडिजचा पराभव दिसून आला. त्यानंतर टीम इंडियाच्या बॉलरनी कमाल करीत विंडिजला धक्क्यावर धक्के दिले. शेवटची विकेट सामीने काढली आणि सचिन तेंडुलकरने हातात स्टंप घेऊन दोन्ही हात उंच पसरवून वानखेडेवरील त्याच्या चाहत्यांना सामोरा गेला खरा. पण सचिनच्या डोळ्यात अश्रु दाटलेच. त्यामुळे स्टेडियमवर सन्नाटा पसरला.

सचिन विश्व : एकिकडे क्रिकेटप्रेमींचा सलाम आणि दुसरीकडे निराशा

Last Updated: Friday, November 15, 2013, 14:33

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आऊट झाल्यानंतर सेंच्युरी पाहायला न मिळाल्यानं सचिन चाहते निराशा झाले. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर ७४ रन्सवर आऊट झाला. आपल्या अखेरच्या टेस्टमध्ये मास्टर इनिंग खेळून सचिन पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी स्टेडियममधील क्रिकेटप्रेमींनी त्याला सलाम ठोकला. त्याच्या या इनिंगमध्ये १२ फोरचा समावेश होता.

बरं का, सचिनचाही एक बॉस आहे !

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 15:09

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वाचा बॉस आहे. मात्र सचिनचाही एक बॉस आहे ! ऐकून आश्चर्य वाटल ना.विशेष म्हणजे सचिन आपल्या बॉसला सिक्स मारायला शिकवतो...चला तर मग पाहूयात मास्टर-ब्लास्टरचा बॉस कोण आहे ते

मास्टर ब्लास्टर सचिनला फेअरवेल गिफ्ट

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 14:39

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्टसाठी वानखेडे स्टेडियमवर जय्यत तयारी करण्यात येतेय. सचिनला फेअरवेल गिफ्ट म्हणून एमसीए त्याला एक पोट्रेट भेट देणार आहे. त्याचप्रमाणे कांदीवलीच्या क्लबला सचिन तेंडुलकर जिमखाना असं नावही देण्यात येणार आहे.