Last Updated: Wednesday, November 13, 2013, 17:02
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्लीमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उद्यापासून सुरू होणारी मॅच त्याच्या कारकीर्दीतली अखेरची मॅच आहे. त्यामुळं देवाच्या निवृत्तीची जोरदार तयारी मुंबईत सुरू आहे. सचिनला ‘बेस्ट ऑफ लक’, ‘वुई मिस यू’ सारखे मॅसेज त्याच्या चाहत्यांकडून मिळतायेत. यातच आणखी एका व्यक्तीचा समावेश झालाय... तो म्हणजे गायक कैलाश खेर....
कैलाश खेरनं खास सचिन तेंडुलकरसाठी ‘सचिन अँथेम’ तयार केलंय. जगामध्ये चांगल्या माणसांची कमी नाही, पण सचिनसारखा एखादाच असतो. सचिननं देशासाठी मौल्यवान कामगिरी केली आहे. माझं हे गाणं त्याच्या अमूल्य कारकीर्दीला सलाम ठोकणारं आहे, असं कैलाशने म्हटलं.
क्रिकेटमधले नाना विक्रम रचणार्याख सचिनसोबत गाणं गायला नक्कीच आवडेल. तो निवृत्त झाल्यानंतर यासाठी त्याच्यासमोर विनंती करीन. हे गाणं त्याला ऐकायला पाठविल्यानंतर सचिनकडून चांगला ‘रिस्पॉन्स’ मिळाला. त्यामुळं मी खूप खूश आहे, असंही कैलाश खेर म्हणला. कैलाशकडून सचिनला देण्यात आलेली ही मानवंदनाच आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ- सौजन्य: बॉलिवूड रॉयल
First Published: Wednesday, November 13, 2013, 16:36