Last Updated: Wednesday, November 13, 2013, 19:10
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईवानखेडे स्टेडिअममधील पत्रकार कक्षाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर झल्यानंतर आज त्याचा नामकरण सोहळा संपन्न झालाय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला असून एमसीएचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे ही यावेळी उपस्थित होते.
उद्धव यांचे स्वीय सचिव आणि न्यू हिंद क्रिकेट क्लबचे चेअरमन मिलिंद नार्वेकर यांनी वानखेडे स्टेडिअममधील प्रेस बॉक्सला बाळासाहेबांचे नाव देण्याबाबत एमसीएकडे एका प्रस्तावाद्वारं विनंती केली होती. या विनंतीनुसार एमसीएनं उद्धव यांचं मत जाणून घेतलं. त्यानंतर प्रेस बॉक्सला बाळासाहेबांचं नाव देण्यास उद्धव यांनी संमती दिली.
आज संध्याकाळी हा सोहळा पार पडला असून एमसीए पदाधिकार्यां प्रमाणंच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, November 13, 2013, 19:04