सोशल मीडियावर फिफा वर्ल्ड कपच्या जाहिरातीचा धुमाकूळ

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 14:32

फिफा वर्ल्ड कप सुरू व्हायला आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळं सगळीकडे आता फूटबॉल फिवर चढलेला दिवस. McDonald नं फिफा वर्ल्ड कपवर एक जाहिरात बनवलीय. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय.

मुख्यमंत्री मोदींच्या पगाराचं काय झालं?

Last Updated: Monday, May 26, 2014, 13:25

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून एक रुपयाही पगार घेत नव्हते. त्यांचा गेल्या १२ वर्षांचा पगार जमा झाला होता. त्यांनी हा पगार आपल्या चालक, रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी भेट दिल्याचा मेसेज सध्या व्हॉट्सअपवर फिरत असून तो धुमाकूळ घालत आहे.

लॅम्पमुळे होतोय खाजगी आयुष्यात अडचण

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 13:29

सावधान! न्यूयॉर्कमधील कायल मॅकडोनाल्ड आणि ब्रायन हाऊस या दोघांनी आवाज रेकॉर्ड करणारा लॅम्प तयार केला आहे.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरनं केलं मरणोत्तर अवयवदान

Last Updated: Monday, March 31, 2014, 14:01

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा चित्रपटांव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही तितकाच परफेक्ट असतो. नुकताच आमिरनं मरणोत्तर अवयवदान केलंय. शनिवारी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात आमिर हा निर्णय घेतला. आमिर खान सध्या त्याच्या `सत्यमेव जयते` या कार्यक्रमाद्वारे समाजात एक नवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित त्यातलंच त्याचं हे एक पाऊल असेल.

`युवराज-विकी डोनर`ची वार्षिक कमाई ४० लाख

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 12:11

हरियाणाचा एक शेतकरी आपल्या रेड्याचं वीर्य विकून ४० लाख रूपयांची वार्षिक कमाई करतो. हा रेडा म्हशींमधील मुर्राह प्रकारातला आहे.

सर्वात मोठा दानशूर फेसबुकचा मार्क झुकरबर्ग

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 11:19

फेसबुक श्री मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या श्रीमती सौ प्रिसिलिया चान हे २०१३ मधील सर्वात जास्त दान करणारे दानशूर अमेरिकन ठरले आहेत. झुकरबर्ग आणि चानने १०.८ कोटी रूपये एका सामाजिक संस्थेला देई केले आहेत. हे शेअर्स ६० अब्ज रूपये किमतीचे आहेत.

दानशूर उद्योजकांमध्ये अझीम प्रेमजी 'नंबर वन'

Last Updated: Friday, January 24, 2014, 17:49

प्रसिद्ध उद्योजक अजीम प्रेमजी यांनी २०१२ ते २०१३ या आर्थिक वर्षात ८ हजार कोटी रूपये सामाजिक कामांसाठी दान केले आहेत.

…आणि मॅडोनाचा पाय घसरला!

Last Updated: Saturday, January 18, 2014, 19:13

नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेली अमेरिकेतील पॉपस्टार मॅडोनाचा पाय घसरलाय... होय, तीनं घातलेल्या उंच टाचांच्या सँन्डलमुळे तिच्यावर सर्वांदेखत तोंडावर पडण्याची वेळ आली.

नाराजी नाट्यानंतर अखेर जोशी सरांनी मागितली माफी

Last Updated: Friday, November 29, 2013, 19:05

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी १८० अंशात यू टर्न घेतलाय. मी चूक केली नाही, मी माफी मागणार नाही... असं याआधी सांगणाऱ्या मनोहर जोशींनी आता चक्क माफी मागितलीय.

चार दिवसांत १ लाख नेत्रदानाचा संकल्प

Last Updated: Friday, November 22, 2013, 18:39

झी २४ तास, सदगुरू मंगेशदा क्रियायोग फाऊंडेशन आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्यावतीनं सुरु असलेल्या नेत्रदान उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळतोय. अवघ्या चार दिवसांत १ लाख लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे.

संकल्प करुया नेत्रदानाचा!

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 07:45

`झी २४ तास`, सद्गुरू मंगेशदा क्रिया फाउंडेशन आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्यावतीन एक स्तुत्य आणि कल्याणकारी असा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आलाय. हा उपक्रम आहे नेत्रदानाचा...

प्रशांत कुटुंबासहीत नेत्रदान मोहिमेत सहभागी!

Last Updated: Saturday, November 9, 2013, 14:43

प्रशांत दामले फॅन फाउंडेशन निर्मीत `नकळत दिसले सारे` या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संपन्न झाला.

‘नकळत दिसले सारे…’ प्रशांत दामलेंचं नवं नाटक

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 08:44

अभिनेता प्रशांत दामले लवकरच एक नवीन नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतायेत ‘नकळत दिसले सारे…’ दृष्टीहिनांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारं हे नाटक आहे. विशेष म्हणजे शुभारंभाच्या प्रयोगाच्या दिवशी स्वतः प्रशांत दामले एक नवा संकल्प करणार आहेत.

एका क्लिकवर फक्त, मिळणार गरजूंसाठी रक्त

Last Updated: Sunday, October 13, 2013, 16:20

दरवर्षी जगभरात अपघातात मृत्यूमखी पडणा-यांची संख्या लाखोंच्या घरात...यामध्येही अनेकदा रुग्णांना आवश्यक रक्तगटाचे रक्त न मिळाल्याने जीव गमवावा लागतोय. मात्र आता चिंता करण्याचं कारण नाही.. कारण रक्त आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

कोल्हापूरच्या महालक्ष्मीला ६५ तोळे सुवर्ण अलंकार दान

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 15:04

करवीर निवासीनी महालक्ष्मीला कर्नाटकातील भक्तांकडून ६५तोळे सोन्याचा हार आणि सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. मेकपाटी राजगोपाल रेड्डी, खासदार राजमोहन रेड्डी आणि आमदार चंद्रशेखर रेड्डी यांच्याकडून हार आणि मुकूट देवीला अर्पण करण्यात आला आहे. ६५तोळ्याच्या हाराची किंमत साधारणपणे २०लाख रुपये इतकी आहे.

भारतात गरज २२ लाख नेत्रदात्यांची!

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 10:47

साठ वर्षीय विठ्ठल बोराडे यांनी औरंगाबादहून आपल्या डोळ्यांवर उपचार करून घेण्यासाठी ते मुंबईतील जे.जे. हॉस्पीटल गाठलंय. लवकरच त्यांना दिसू लागणार आहे...

फुटबॉलपटू मॅराडोनाची फोटोग्राफरला किक

Last Updated: Thursday, August 1, 2013, 08:42

प्रसिद्ध फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना पुन्हा एकदा चर्चेत आलाय.एका मॅगझिन फोटोग्राफरला त्यानं किक मारलीय. ही किक मॅराडोनानं जाणूनबुजून मारल्याचा आरोप फोटोग्राफर एनरीक मेडिना यानं केलाय.

‘आम आदमी पार्टी’ बनली करोडपती!

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 15:46

अण्णा हजारेंशी फारकत घेऊन राजकारणाच्या माध्यमातून आपली वेगळी वाट निवडणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’ला मिळणारा लोकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र दिसतंय.

मॅक्डोनल्ड्समध्ये लहानग्याने गिळला काँडोम!

Last Updated: Sunday, March 17, 2013, 16:46

भारतासह जगभरात मॅक्डोनल्ड्सचा बर्गर प्रचंड लोकप्रिय आहे. तसंच आकर्षक आणि स्वच्छ असणाऱ्या मॅक्डोनल्ड्स फ्रंचाइजी जगभरात नावाजल्या जातात. पण अमेरिकेतल्या शिकागोमध्ये अशी घटना घडली आहे, की त्यामुळे मॅक्डोनल्ड्स अडचणीत आलंय. मॅक्डोनल्डमध्ये एका दोन वर्षाच्या मुलाने चक्क काँडोम गिळलं.

सौरव गांगुलीची गोची केली नगमाच्या या फोटोने...

Last Updated: Tuesday, December 18, 2012, 16:33

टीम इंडियाचा `दादा` सौरव गांगुली हा त्याच्या कारकिर्दीत बराच चर्चेत होता. मात्र त्याच्या एका फोटोने तो चांगलाच अडचणीत आला होता.

प्रियांका गांधी करणार अवयव दान

Last Updated: Thursday, December 6, 2012, 21:19

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी वढेरा यांनी बुधवारी अवयवदान करण्याची घोषणा केलीय. यावेळी मार्क्सावादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांच्यासह ५०० जणांनी आज अवयवदानाची शपथ घेतली.

दिएगो मॅरेडोना भारतात!

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 14:14

अर्जेंटीनाचा माजी स्टार फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना भारतात दाखल झालाय. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेला मॅरेडोना प्रथम कोच्चीमध्ये दाखल झालाय.

मॅडोनाने पाठीवर ओबामांचे नाव कोरले....

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 11:37

पॉप गायिका मॅडोनाने आपल्या पाठीवर अमेरिकन राष्ट्रपती ओबामांच्या नावाचा टॅटू काढून घेतला आहे. न्यूयॉर्कच्या यांकी स्टेडियममध्ये आपल्या एमडीएनए टूरमधील कार्यक्रमादरम्यान मॅडोनाने प्रेक्षकांना हा टॅटू दाखवला.

`स्पर्म डोनर`च्या पत्नीचा अजब दावा

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 14:04

स्पर्म डोनेशनवर आधारित ‘विकी डोनर’ सिनेमाने स्पर्म डोनेशनबद्दल भारतात चांगली जागृती केली. पण इंग्लंडमध्ये मात्र एका स्पर्म डोनरच्या पत्नीमुळे वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. आपल्या पतीचं वीर्य ही आपली वैवाहिक संपत्ती आहे, असं एका स्पर्म डोनरच्या पत्नीचा दावा आहे. एवढंच नव्हे, तर आपल्या आपल्या पतीच्या वीर्याला वैवाहिक संपत्तीचा दर्जा मिळावा यासाठी तिने ‘ह्यूमन फर्टिलायजेशन अॅआब्रयोलॉजी अॅ्थोरिटी’कडेही (एचएफआयए) अर्ज केला आहे.

स्पर्म डोनेशन चांगलं काम आहे- रणबीर कपूर

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 22:53

स्पर्म डोनेशन (वीर्य दान) हे एक उत्तम समाजकार्य आहे, असं मत रणबीर कपूरने व्यक्त केलं आहे. “स्पर्म डोनेशन हे चांगलं काम आहे. तुम्ही त्याद्वारे दुसऱ्यांना मदत करत असता.” अशा शब्दांत रॉकस्टार रणबीरने स्पर्म डोनेशनचं महत्व मान्य केलं.

जॉन अब्राहमचा महिलेला हवाय शुक्राणू

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 17:57

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने आगामी चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता होण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने त्याने पावले उचलली आहेत. मात्र, ज्या विषयावर चित्रपट होणार आहे, त्याच विषयाचा धागा एका महिलेने पकडला आहे. तिचे चक्क जॉन अब्राहमचा शुक्राणू (स्पम) मागितला आहे. या महिलेला गर्भधारणेची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तिलाजॉनचा स्पम हवा आहे.

मेडिकल कॉलेजेसमध्ये जागांची विक्री!

Last Updated: Monday, April 16, 2012, 22:56

राज्यात मेडिकल कॉलेजेसमध्ये जागांची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोपाची चौकशी होणार आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या आरोपानंतर, या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी केली आहे.

भूकंपाच्या हादऱ्यांमुळे त्सुनामीची शक्यता

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 15:42

जागतिक वेळेनुसार ९.३० वाजता इंडोनेशियातील बांडा असेह प्रांतात त्सुनामी येऊ शकते, अशी शक्यता वॉर्निंग सेंटरने वर्तवली आहे. इंडोनेशियाच्या या प्रांतात बहुतेकवेळा भूकंपाचे हादरे बसत असतात. २००४ साली झालेल्या भूकंपामध्ये या प्रांतातील १,७०,००० लोकांचा मृत्यू झाला होता.

गरीब कुटुंबाचं समाजकार्य

Last Updated: Sunday, January 22, 2012, 09:55

उल्हासनगरमधल्या म्हारळ गावातल्या मजुरी करणाऱ्या कुटुंबानं अपघातात मरण पावलेल्या मुलाचं देहदान केल्यामुळं तीन जणांना जीवदान मिळालं आहे. एका वेठबिगारी करणाऱ्या कुटुंबानं केलेलं हे काम समाजापुढं नवा आदर्श उभा कऱणारं आहे.

पुणे वॉरिअर्सची धुरा 'दादांवर'

Last Updated: Saturday, January 21, 2012, 15:56

आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या पुणे वॉरिअर्सच्या प्रशिक्षकाची कमान आता टीम इंडियाचा बेधड माजी कर्णधार सौरव गांगुली संभाळणार आहे. त्याच्यातील आक्रमकता पुणे वॉरिअर्स संघाच्या अंगी येईल का, याचीच उत्सुकता आहे. सौरव गांगुली हा आयपीएलच्या पाचव्या मोसमासाठी पुणे वॉरिअर्स संघाच्या प्रशिक्षकांमध्ये समावेश केला आहे.

'किडनी'च्या प्रेमाची गोष्ट !

Last Updated: Friday, January 6, 2012, 21:23

किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली आहे. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाली.

२६/११ला पोलिसांची 'नवी दृष्टी'

Last Updated: Saturday, November 26, 2011, 07:41

२६/११ च्या निमित्तानं पुणे पोलिसांनी मरणोत्तर नेत्रदानाचा कौतुकास्पद संकल्प केलाय. पुण्यातल्या दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या १२६ पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी हा निर्णय घेतलाय. त्यासाठी त्यांनी फॉर्म्सही भरुन दिलेत.