Last Updated: Friday, May 17, 2013, 20:09
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशांताकुमारन श्रीशांत... भारतीय क्रिकेटमधील बॅडबॉय...... टीम इंडियातील अनेक क्रिकेटर्स आपल्या मैदानातील कामगिरीने चर्चेत असतात... मात्र श्रीशांत नेहमीच आपल्या गैतवर्तणुकीमुळेच चर्चेत राहिला...
एस श्रीशांत भारतीय क्रिकेटमधील बॅडबॉय....आतापर्यंत अनेकदा मैदानातील कामगिरीपेक्षा वायफळ बडबड आणि गैतवर्तवणूकमुळेच श्रीशांत चर्चेत राहायलाय..आता फिक्सिंगमुळे त्याचं क्रिकेटचा एन्ड झालाय..
मैदानावर डान्स श्रीशांत प्रथम सर्वांच्या लक्षात राहिला तो दक्षिण आफ्रिका दौ-यात 2006 साली... या दौ-यात श्रीशांतने आंद्रे नेलला सिक्सर लगावल्यानंतर पीचवर डांस करायला सुरूवात केली होती...
मैदानात स्लेजिंगत्यानंतर 2007साली भारताच्या दौ-यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धही श्रीशांतने आपली वागणुकीने सर्वांनाच भुवया उंचवायला लावल्या... प्लेईंगि इलेव्हनमध्ये नसलेल्या श्रीशांतने ऍन्ड्रूय सायमंड्स आऊट झाल्यानंतर मैदानात पाणी घेऊन जाताना सायमंड्सविरूद्ध स्लेजिंग केली होती...
मैदानात गैरवर्तवणूक त्याचवर्षी इंग्लंडच्या दौ-यावर गेलेल्या भारतीय टीममध्येही श्रीशांतची निवड झाली होती... या दौ-यात खेळलेल्या ट्रेन्ट ब्रिज टेस्टमध्ये श्रीशांत स्वैर मारा केला होता... मॅचदरम्यान तर त्याने केव्हिन पीटरसनवर बीमरही मारला होता... तसंच त्यानंतर पीचवर पुढे पळून जात असताना पॉल कॉलिंगवूडबद्दल अपशब्द वापरले... त्याच्या या अशा वर्तणूकीची गंभीर दखल घेताना मॅच रेफ्रींनी त्याच्या मानधनातील 50 टक्के रक्कम दंड स्वरूपात कापली होती..
थप्पड प्रकरण 2008 साली झालेल्या आयपीएलच्या पहिल्या वहिल्या सीझनमध्ये हरभजनने श्रीशांतच्या कानाखाली काढलेल्या आवाजाची गुंज तर आजही ऐकायला मिळते... या प्रकरणानंतर भज्जीला संपूर्ण टूर्नामेंटकरता बॅन करण्यात आलं होतं...
मैदानात वाद 2009 साली ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना ऑसी ओपनर मॅथ्यु हेडनने श्रीशांतला सलग तीन सिक्सर्स ठोकले.. यानंतर हल्ल्याने वैतागलेला श्रीशांत रागाच्या भरात हेडनच्या अंगावर धावून गेला... तेव्हा पत्रकार परिषदेत हेडनने श्रीशांत ओव्हररेटेड बॉलर असल्याची टीका केली होती...2010-11 दक्षिण आफ्रिकन दौ-यादरम्यानही श्रीशांत आफ्रिकन कॅप्टन ग्रॅमी स्मिथला जाऊन भिडला होता... त्यावेळी टीम इंडियाचा कॅप्टन धोनीनेही मान्य केलं होतं की श्रीशांतला आवरणं फारच कठीण काम आहे...
मैदानाबाहेर वाद त्यानंतर 2012 मध्ये दिल्लीला येण्याकरता बंगळुरूहून विमानात बसलेल्या श्रीशांतने आवडती सीट न मिळाल्याने फ्लाईट अटेंडंटशीच गोंधळ घातला होता.. त्याच्या या गोंधळामुळे फ्लाईटला उशीर झाला... मात्र या प्रकारानंतर श्रीशांतने सर्व आरोप फेटाळले होते...
आता श्रीशांतला दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक केलीय....आतापर्यंत श्रीशांतनं मैदानात वाद घातेल मात्र आता त्यांनं लाखो क्रिकेट चाहत्यांचा विश्वासघात केलाय.... त्यामुळे यावेळी या श्री 420ला माफी मिळणं दुरापास्तच... इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 17, 2013, 20:09