Last Updated: Friday, May 17, 2013, 21:30
तेरा वर्षांपूर्वी क्रिकेटला लागली फिक्सिंगची किड
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईक्रिकेट हा आता जंटलमन्स गेम राहिलेला नाही...या खेळात पैसा आणि ग्लॅमरने शिरकाव केला आणि हा जंटलमन्स गेम संपला.. फिक्सिंग या कलंकित करणा-या घटनेने आता क्रिकेट आणि क्रिकेटपटूंनाही आपल्या जाळ्यात ओढलय. तब्बल तेरा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिक्सिंगच पहिलं प्रकरण जगासमोर आल आणि सार क्रिकेटविश्वच अक्षरश: हादरुन गेल.
फिक्सिंगचा फास7 एप्रिल 2007
हॅन्सी क्रोनिए 2007मध्ये क्रिकेटविश्वाला मूळापासून हादरवणारी घटना घडली....दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हॅन्सी क्रोनिए आणि एका बुकी दरम्यानचा संभाषण पोलिसांच्या हाती लागलं....क्रोनिएने मॅच आणि वातावरणाबाबत माहितीदेण्यासाठी दहा ते पंधरा हजार अमेरिकन डॉलर स्वीकारल्याची कबुली दिली. या फिक्सिंग प्रकरणात क्रोनिएशिवाय दक्षिण आफ्रिकेचे हर्षल गिब्स, हेन्री विलियम्स, निकी बोये या क्रिकेटपटूंचाही समावेश होता.
6 मे 2000
वॉ आणि वॉर्नने माहिती देण्यासाठी पैसे घेतले ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू मार्क वॉ आणि शेन वॉर्नला पिच आणि वातावरणाची माहिती देण्यासाठी बुकींनी पैसे देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र अपू-या पुराव्याअभावी क्रिकेटपटूंवर काहीही कारवाई झाली नाही.
24 मे 2000
पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडून मॅच फिक्सिंगपाकिस्तानचे क्रिकेटपटू सलीम मलिक आणि अता-उर-रेहमान हे मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले. दोघांवरही आजीवन बंदी लादण्यात आली.
31 ऑक्टोबर 2000
भारतीय क्रिकेटपटू फिक्सिंगमध्ये सीबीआयने एक रिपोर्ट सादर केला त्यामध्ये प्रथमच भारतीय क्रिकेटपटू फिक्सिंग करत असल्याच स्पष्ट झाल. त्यावेळेचा भारताचा कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीनने मॅच फिक्स केल्याची कबुली दिली. याप्रकरणात अजय जाडेजा, अजय शर्मा, मनोज प्रभाकर यांचाही समावेश होता. याप्रकरणी अझरुद्दीन आणि अजय शर्मावर आजीवन बंदी लादण्यात आली. तर अजय जाडेजा आणि मनोज प्रभाकरवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली.
17 ऑगस्ट 2004
केनियन क्रिकेटपटूने पैसे स्वीकारलेकेनियाचा माजी कॅप्टन मौरीस ओडुम्बेवर बुकीकडून पैसा घेतल्यामुळे त्याच्यावर केनियन क्रिकेट एसोसिएशनने पाच वर्षांची बंदी लादली. ओडुम्बेच करियर संपुष्टात आला.
13 मे 2008
वेस्ट इंडिज क्रिकेटपटूने पैसे स्वीकारले वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मार्लन सॅम्यूएल्स याने भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान नागपूर इथं झालेल्या वन-डे मॅचबाबत बुकीला माहिती देण्यासाठी पैसे स्वीकारल्याच स्पष्ट झाल. सॅम्यूएल्सवर 2 वर्षांची बंदी लादण्यात आली. बंदीनंतर सॅम्यूएल्सने कमबॅक केल.
15 मे 2010
कौंटी क्रिकेटमध्ये स्पॉट फिक्सिंगइसेक्सचा क्रिकेटपटू दानिश कनेरिया आणि मार्वेन वेस्टफिल्डला स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अट करण्यात आल. कनेरियावर आजीवन बंदी लादण्यात आली. तर वेस्टफिल्डने टीम बदलली.
29 ऑगस्ट 2010
पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे स्पॉट फिक्सिंग एका स्टिंग ऑपरेशमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू सलमान बट, मोहम्मद असिफ आणि मोहम्मद आमिर स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळले. याशिवाय कामरान अकमल, उमर अमिन आणि वहाब रियाझ यांचाही समावेश असल्याचा संशय व्यक्त केला गेला. सलमान बट, आणि मोहम्मद असिफवर पाच वर्षांची बंदी लादण्यात आली. मोहम्मद आमिरला वयाने लहान असल्याने रिमांड होममध्ये पाठवण्यात आल. उमर अमिन आणि वहाब रियाझला वॉर्निंग देऊन सोडण्यात आल तर उमर अकमलला क्लिन चिट देण्यात आली.
14 मे 201२
आयपीएल -5मध्ये फिक्सिंगएका स्टिंग ऑपरेशमध्ये पाच क्रिकेटपटूंनी फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले. टी.पी. सुधींद्र, अभिवन बाली, सलभ श्रीवास्तव, अमित यादव आणि मोहनिश मिश्रा यांचा फिक्सिंगमध्ये समावेश. यातील टी.पी.सुधींद्रवर आजीवन बंदी घालण्यात आली. तर सलभ श्रीवास्तवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली. तर उर्वरित तिघांना एक वर्षांची बंदीची शिक्षा देण्यात आली.
15 मे 2013
आयपीएल -6मध्ये स्पॉट फिक्सिंगएस.श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पोलिसांनी अटक केली...
या सा-या प्रकरणांवर नजर टाकल्यास असच म्हणाव लागेल की आता क्रिकेट जंटलमन गेम राहिलेला नाही... पैशांसाठी काही खेळाडूंनी कोट्यवधी चाहत्यांचा विश्वासघातच केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 17, 2013, 21:29