राज आणि अजित पवारांमध्ये जुगलबंदी Fight between Ajit Pawar & Raj Thackeray

राज आणि अजित पवारांमध्ये जुगलबंदी

राज आणि अजित पवारांमध्ये जुगलबंदी
www.24taas.com, मुंबई

राज ठाकरे आणि अजित पवार या दोन नेत्यांधील शाब्दीक युद्धानं सध्या चांगलाच पेट घेतला आहे. राज ठाकरेंची टीका त्याला अजितदादांच चोख उत्तर आणि त्यावर पुन्हा राज यांचा पलटवार असं चक्र मागील पंधरवड्यापासून सुरु आहे. राजकारणातील दोन मातब्बर पुतण्यांमध्ये कोणत्या मुद्यावर जुगलबंदी सुरु आहे.

कोल्हापूरमध्ये झालेल्या पहिल्या सभेत राज ठाकरेंनी अजित पवारांवर थेट हल्ला चढवला. त्यांच्या टीकेनंतर या राजकीय जुगलबंदीची पहिली ठिणगी पडली. राज यांचा हा हल्ला अजितदादांच्या चांगलाच जिव्हारी लागला. राज यांच्या भाषण शैलीवरच त्यांनी हल्ला चढवला.

अजितदादांच्या या आरोपाला राज यांनी दुस-या दिवशी खेडच्या सभेत सडेतोड उत्तर दिलं. या आरोपावर अजितदादांचं लगेच उत्तर आलं नाही. पण त्यामुळे हा विषय इथंच संपला नव्हता. सोलापूरच्या सभेत अजित दादांवरील हल्ल्याचं पुढचं टोक राज यांनी गाठलं. राज यांच्य़ा या आरोपाला अजितदादांनी वाशिममध्ये तितक्याचं आवेशानं उत्तर दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही अजित पवार हे आपलं पहिलं टार्गेट असल्याचं राज यांनी आपल्या दौ-यात दाखवून दिलं आहे. तर अजितदादाही त्यांच्या आरोपांना तितक्याच सडेतोडरित्या उत्तर देत आहेत. दोन्ही नेत्यांचा आक्रमक मूड पाहता येत्या काळातही ही टीकेची पातळी आणखी खालचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

First Published: Sunday, February 24, 2013, 22:37


comments powered by Disqus