Last Updated: Saturday, February 23, 2013, 17:03
www.24taas.com, सांगलीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजितदादा आणि आर. आर. आबा यांच्यावर केलेल्या टीकेचे संतप्त पडसाद सांगलीत उमटले आहेत. राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. सांगलीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालया बाहेर राज ठाकरे यांचे पोस्टर जाळण्यात आले.
यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी निदर्शने करून राज ठाकरेंच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सोलापुरात शुक्रवारी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर बोचरी टीका केली. ही टीका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना झोंबली.
बेताल आणि बाष्कळ बडबड करून आमच्या नेत्याविरोधात टीका करून टींगल केली जाते, ज्यांनी अनेक वर्ष सामान्यांसाठी काम केलं त्या आमच्या नेत्याबद्दल राज ठाकरे यापुढे बोलले तर राष्ट्रवादीचा कोणताच कार्यकर्त्या सहन करणार नाही. अशी निदर्शकांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली.
First Published: Saturday, February 23, 2013, 16:54