Last Updated: Tuesday, March 26, 2013, 23:48
www.24taas.com, मुंबईहोळीच्या निमित्ताने धुळवड आणि नंतर रंगपंचमी साजरी केली जाते...विविध प्रकारचे रंग त्यासाठी वापरले जातात..पण काही लोक पैशांसाठी घातक रसायनयुक्त रंगाची विक्री करतात आणि त्याचा परिणाम ग्राहकांना भोगावा लागतो...गेल्या काही वर्षात हे प्रकार वाढले आहेत..गेल्यावर्षी नागपूरमध्ये तर ४०० जणांना घातक रसायनयुक्त रंगाची बाधा झाली होती
रंगाचा उत्सव अर्थात रंगपंचमी ....वर्षभर लहानथोर या सणाची वाट पहात असतात...कारण रंग खेळण्याचा आनंद काही औरच...भेदभाव विसरुन लोक एकमेकांना रंग लावतात...त्यामुळेच या सणाची ख्याती सातासमुद्रार जाऊन पोहोचलीय...पण गेल्या काही वर्षात या सणाचं रुप बदललंय...आज विविध प्रकारचे आज बाजारात विकले जातात..पण काही लोक पैशाच्या लोभापाई घातक रसायनयुक्त रंगांची विक्री करत आहे...आणि त्यामुळे तुमच्या रंगाचा बेरंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घातक रसायनयुक्त रंगांमुळे त्रास होणारा अंकुश एकटच नाही. गेल्यावर्षी तर नागपूरमध्ये जवळपास ४०० जणांना घातक रसायनयुक्त रंगाचा फटका बसला आहे..त्यापैकी सहाजणांवर तर दृष्टी गमावण्याची वेळ आली. होळीच्या रंगामुळे त्यांच्या डोळ्यांना इजा झाली ५ पेशंट असं आहेत त्यांच्या डोळ्यांची नजर गेली..१५ पेशांट कायमची नजर गेली.
रंगात घातक रसायनांचा वापर केला गेल्यामुळे तो प्रकारघडल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. रेती ,काच पावडर चमकण्यासाठी कॉपर सल्फेट मर्क्युरी सल्फेट हे केमिकल डोळ्यांना इजा होते. रंगामध्ये वापरल्या जाणा-या या घातक रसायनांमुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असून या रंगपंचमीला रंग खरेदी करतांना तसेच खेळतांना त्यामध्ये घातक रसायनांची भेसळ तर नाही ना याची खात्री करुन घ्या...अन्यथा तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही..
घातक रासायनीक रंगाचे शरिरावर दुष्परीणाम होतात..त्यामुळे आता नैसर्गिक रंगाचा वापर करण्याकडं लोकांचा ओढा वाढू लागला आहे...कोल्हापूरातील एक अशीच संस्था जी पर्यावरण पुरक उपक्रम राबवत असून नैसर्गिक रंगांच्या वापरासाठी जनप्रबोधन करण्याचा प्रयत्न त्या संस्थेक़डून केला जात आहे..
First Published: Tuesday, March 26, 2013, 23:48