बीसीसीआयच्या दोन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा!, AJAY SHIRKE RESIGN

बीसीसीआयच्या दोन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा!

बीसीसीआयच्या दोन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आयपीएलमधील मॅच फिक्सींग वरुन सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन पद सोडण्यास तयार नाहीत, मात्र, बीसीसीआयचे खजिनदार अजय शिर्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. सोबतच बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनीही आपला राजीनामा सोपवलाय.

बीसीसीसआयचे खजिनदार अजय शिर्के यांनी शुक्रवारी सकाळीच या प्रकरणावरुन राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘बीसीसीआयची ही बदनामी सुरू आहे… ती योग्य वाटत नसल्यानं आपण पद सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचं’ त्यांनी यावेळी म्हटलं होतं. एन. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असं शिर्के यांनी म्हटलेल नसलं तरी ‘श्रीनिवासन यांच्या जागी आपण असतो तर राजीनामा दिला असता’ असं सांगत शिर्के यांनी श्रीनिवासन यांना जोरदार टोला लगावला होता आणि आता आपल्या म्हणण्यानुसार त्यांनी आपला राजीनामा मंडळाकडे सादर केला आहे.


अर्थात अजय शिर्के यांनी घेतलेली ही भूमिका बीसीसीआयच्या हिताखातर आहे की बीसीसीआयमधील अंतर्गत राजकारणाचा भाग? या विषयी शंका उपस्थित करण्यात येतेय.

अजय शिर्के हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचेही अध्यक्ष असून शरद पवारांचे निकटवर्तीयही आहेत. यामुळे हातच राखूनच त्यांनी आपली भूमिका मीडियासमोर मांडली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 31, 2013, 20:52


comments powered by Disqus