Last Updated: Friday, May 31, 2013, 12:53
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर अखेर क्रिकेटर आणि खासदार सचिन तेंडुलकरनं मौन सोडलंय. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर भाष्य करणारा सचिन पहिला क्रिकेटपटू ठरलाय.
गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे सचिन व्यथित झालाय. त्याला या गोष्टींवर विश्वासही ठेवणं कठिण जातंय. तो म्हणतो ‘मागच्या आठवड्यात स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील उघड झालेल्या गोष्टी धक्कादायक आहेतच पण त्या निराशाजनकही आहेत’.
‘क्रिकेट हा खेळ वाईट गोष्टींसाठी जेव्हा जेव्हा चर्चेत आणि बातम्यांत आलाय तेव्हा तेव्हा मला त्या दुखावून गेल्यात’ असं भावूक सचिननं म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 31, 2013, 12:53