Last Updated: Thursday, May 30, 2013, 16:52
www.24taas.com, झी मीडिया, लंडन स्पॉट फिक्सिंगप्रकरणी महेंद्रसिंग धोनीनं पुन्हा नकार दिलाय. योग्य वेळ आल्यावर मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, असं धोनीनं लंडनमध्ये म्हटलंय.
‘या प्रकरणी मी भारतामध्ये काही बोललो नाही, इथे कसा बोलू?’ असा सवाल असा प्रश्न धोनीनं लंडनमधल्या पत्रकार परिषदेमध्ये विचारला. मला माझ्या टीमला वाद-विवादापासून दूर ठेवायचंय असंही त्यानं म्हटलंय. भारतीय क्रिकेट टीमच्या खेळांबद्दल निर्माण झालेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना भारतीय खेळाडूंचं मनोधैर्य अजिबातच खचलेलं नाही, म्हणताना मागील काही दिवसांत घडलेल्या प्रकरणाचा टीमच्या मनोधैर्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलंय. काही खेळाडू मानसिक रुपानं कमजोर असू शकतात, असं धोनीनं मान्य केलंय.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लंडनला रवाना होण्याआधी भारतात पत्रकारांनी आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणावर त्याला प्रश्न विचारले तेव्हाही त्यानं ‘मौनीबाबा’चं रूप धारण केलं होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 30, 2013, 16:52