Last Updated: Thursday, May 30, 2013, 16:22
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आता राजकीय नेत्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलीय.
सर्वप्रथम बीसीसीआयच्या आर्थिक समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत या विषयाची ओपनिंग केली. राजीव शुक्ला आणि अरुण जेटली या बीसीसीआयच्या पदाधिका-यांनीही काल श्रीनिवासन यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत दूर रहा असा सल्ला दिलाय.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वच IPL सामन्यांची चौककशी करा असं सांगत श्रीनिवासनची विकेट टाकण्यासाठी यॉर्कर टाकलाय. राजकीय नेत्यांच्या या दबावामुळे लवकरच श्रीनिवासन यांची विकेट पडण्याची शक्यता आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 30, 2013, 16:19