Last Updated: Wednesday, December 18, 2013, 18:51
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली शरीराची तब्बेत निरोगी आणि तंदुरुस ठेवण्यासाठी हिरव्यागार पालेभाज्या या भरपूर फायदेशी आहे, हे काही वेगळ सांगायची गरज नाही. मात्र या हिरव्यागार भाज्यांमध्ये कारल्याचे महत्त्व हे वेगळेच आहे. भाजीच्या रुपात कारल्याचे फायदे फार महत्त्व पूर्ण आहे. कारलं हे पोटाच्यासंबंधीत असणारे सर्व आजार दूर करते.
जर का तुम्हाला यकृतासंबंधी काही समस्या असतील तर रोज एक ग्लास कारल्याचा ज्युस प्यावा. या ज्युसमध्ये जर लिंबू मिसळून प्राशन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग, पिंप्लस आणि त्वचेच्या आजारापासून मुक्ती मिळते.
कारल्यामध्ये इन्सूलिनसारखे रसायन असते त्यामुळे रक्तदाबच्या स्थितीतीला ते कमी ठेवते. कारल्याच्या ज्युसमध्ये एंटीऑक्सिडेंट असल्यामुळे ते शरीरातील पचनक्रिया मजबूत बनवते. त्यामुळे शरीराचे वजन कमी होते. उल्टी आणि एकदाम जीव घबरण्यासारख्या आजारांवर कारल्याच्या ज्युसमध्ये काळमीठ आणि थोडं पाणी मिसळून पिणे आरोग्याला चांगले असते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, December 18, 2013, 18:51