Last Updated: Sunday, July 21, 2013, 07:55
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई पाऊस जोरात पडतोय. बाहेर जाऊन पावसात मनसोक्त भिजण्याची इच्छा आहे पण भीती वाटतेय, ‘आजारी पडलो तर..., वस्तू खराब झाल्या तर...’ पण काही वेळाकरता ही भीती बाजूला ठेवा आणि पावसात मनसोक्त भिजून मोकळ्या जीवनाचा आनंद घ्या. हो पण भिजण्याआधी आणि भिजल्यानंतर थोडी काळजी जरूर घ्या.
> पावसात भिजून आल्यानंतर तातडीनं हात-पाय स्वच्छ धुऊन व्यवस्थित पुसून घ्या. ओले कपडे तातडीनं बदला. त्यामुळे सर्दी-खोकला तुमच्यापासून लांब राहील.
> चप्पल, सॅन्डल भिजल्यानंतर त्यांना उभं करून ठेवा त्यामुळे त्यांच्यामध्ये पाणी साठून राहणार नाही. तसंच त्यांच्यातली कोमलताही कायम राहील.
> साडी वापरत असाल तर खालच्या बाजूने जमिनीवर लोळत राहील अशा पद्धतीनं घालू नका. पावसात कुर्ता, लेगिंग्स, शर्ट-ट्रऊजर, सलवार-सूट परिधान करणं जास्त फायदेशीर ठरेल.
> दुचाकी वाहन चालवत असाल तर थोडी सावधानता बाळगा. माती आणि चिखलात पावसामुळे दुचाकी वाहनं घसरण्याची जास्त शक्यता असते.
> बाहेरून आल्यानंतर रेनकोट आणि छत्री अशा पद्धतीनं ठेवा ज्यामुळे त्यांच्यातलं पाणी निथळून जाईल.
अंग पुसण्यासाठी पातळ टॉवेलचा वापर करा.
> ओले कपडे लगेचच सुकण्यासाठी टाका नाहीतर त्यांतून दुर्गंधी येण्याचा संभव असतो.
> मुलांच्या दप्तरात किंवा तुमच्या बॅगमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर जरूर करा.
> लोणचं-मुरंब्याच्या बरण्या व्यवस्थित बंद करून ठेवाव्यात.
> विजेच्या तारा उघड्या असतील तर लगेचच दुरुस्त करून घ्या किंवा त्यावर टेप चिटकवून टाका. त्यामुळे दुर्घटना टळतील.
> जवळचे नाले, नदी, तलाव किंवा पाणवठ्यावर मुलांना एकट्याला पाठवून का. या दिवसांत सज्ञान व्यक्तींनीही हा मोह टाळावा.
> या दिवसांत जमिनीवर झोपणं टाळा.
> पाणी उकळूनच प्या त्यामुळे अनेक आजार दूर राहतील
> या दिवसांत भाज्यांवर जास्त माती असते. अशावेळी भाज्यांना पोटॅशिअम परमॅग्नेट मिसळलेल्या पाण्यात टाका. त्यामुळे त्यातील सगळी माती निघून जाईल. किटकनाशकांचाही प्रभाव कमी होईल.
> या दिवसांत दह्याऐवजी लिंबाचा वापर जास्त फायदेशीर ठरतो.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, July 21, 2013, 07:55