लग्नाच्या आधी वजनाची चिंता सतावतेय?,Weight before the wedding satavateya worry?

लग्नाच्या आधी वजनाची चिंता सतावतेय?

लग्नाच्या आधी वजनाची चिंता सतावतेय?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जास्त वजन असल्यामुळे अनेक लोकांना जास्तीत जास्त समस्यांना सामोरे जावं लागतं. वजन वाढल्यामुळे तरूणांना लग्नाच्या वेळी अडचणी भेडसावतात. विशेष तज्ज्ञांच्या मते, लग्न समारंभात सर्वत्र गोड खाऊनदेखील वजन कमी करता येते. त्यामुळे लग्नकार्यात बिनधास ‘मिठाई’ खा...

तुम्ही जर स्वता:च्या लग्नात धडधाकड दिसण्याचा प्रयत्न करात असाल तर आपल्या शरीराकडे लक्ष केंद्रीत करा आणि प्रत्येक आठवड्यात एक किलोग्राम वजन कमी करा... पण, ‘अमूक अमूक करून झटपट वजन घटवा’ असं सांगणाऱ्यांपासून सावध राहा. कारण जेवढ्या वेगाने वजन घटते तेवढ्याच वेगानं पुन्हा वजन वाढल्याचं तुमच्या लक्षात येईल.

यापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी आपण योग्य तोच आहार घ्या आणि योग्य व्यायाम करा. त्याचबरोबर प्रमाणापेक्षा जास्त आहार घेऊ नका आणि उपाशीपोटीदेखील राहू नका. आपल्या योग्य पचनक्रियेसाठी दिवसाची सुरुवात पोषक आहारपासून करा. त्यामध्ये अंडी, ताजे फळ, बदाम, दही, ताक, इडली, पोहे, इ. पोषक आहार पर्याय आहे.

पोषक आहार घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये... व्यायामामध्ये पोहणे, नृत्य किंवा इतर खेळ समाविष्ट केले जाऊ शकतात. लग्न समारंभात मोठ्या प्रमाणावर तणाव येऊ शकतो त्यामुळे योग्य त्या योजना अगोदरपासून आखाव्यात. तसेच घरात चिप्स, मिठाई आणि चॉकलेट्स ठेऊ नये आणि त्यावर तावही मारू नये.

जर तुम्हाला तुमच्या प्रगतीचा आलेख ठेवायचा असेल, तर एका डायरी आपल्या दररोजच्या खाण्याचा आणि व्यायामाची नोंद करा.... त्यात आपल्या दिनक्रमाची नोंद करा... आणि एका महिन्यानंतर पाहा तुम्हालाच तुमच्या वजनात आणि आरोग्यात कमालीचा फरक जाणवेल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 27, 2013, 19:00


comments powered by Disqus