चालत्या कारमध्ये मित्रांनीच केला महिलेवर बलात्कार, 2 friends Rape on girl in car

चालत्या कारमध्ये मित्रांनीच केला महिलेवर बलात्कार

चालत्या कारमध्ये मित्रांनीच केला महिलेवर बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, गुडगाव

देशाची राजधानी दिल्ली जवळच गुडगामध्ये दोन मित्रांनी आपल्या महिला मैत्रिणीवप कारमध्येच सामूहिक बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. तर त्याच्यासोबत असणाऱ्या आणखी एका आरोपीचा शोध घेत आहे. २३ वर्षीय तरूणीवर तिच्याच मित्रांनी बलात्कार केल्याचे समजते.

दोन्ही आरोपी युवक दिल्लीवरून महिलेला हरियाणातील गुडगावच्या सहारा शॉपिंग मॉलमध्ये घेऊन आले होते. आणि त्यानंतर तेथून तिला निर्जनस्थळी घेऊन गेले. आणि अशाच निर्जन स्थळी महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर दोघांनी त्या युवतीला गाडी बाहेर फेकून दिलं. आणि फरार झाले.

महिलेने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटकही केली. दुसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी एक टीमही पाठवली आहे.

First Published: Thursday, May 2, 2013, 14:24


comments powered by Disqus