महिलेला बेशुद्ध करून डॉक्टरने केला रेप?, woman raped by doctor in thane

महिलेला बेशुद्ध करून डॉक्टरने केला रेप?

महिलेला बेशुद्ध करून डॉक्टरने केला रेप?
www.24taas.com, ठाणे

इलाज करण्यासाठी आलेल्या महिलेला बेशुद्ध करून बलात्कार केल्याचा महिलेने डॉक्टरवर केला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी डॉक्टरांच्या शोधात पोलिस आहेत.

मुंब्रा येथील पोलिस स्टेशनचे उप-निरीक्षक लक्ष्मण राठोड यांनी सांगितले की, डॉ. विलियम जेकब यांचा दिवा येथे खासगी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये इलाज करण्यासाठी २४ वर्षीय पीडित महिलेला दाखल करण्यात आले.

२४ एप्रिलला दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पीडित महिला हॉस्पिटलमध्ये दाखल असताना डॉ. जेकब यांनी तिला एक पदार्थ दिला, त्यानंतर ती बेशुद्ध झाली. या बेशुद्धीच्या अवस्थेत डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने लावला आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोधात आहे.

First Published: Friday, May 3, 2013, 16:28


comments powered by Disqus