Last Updated: Saturday, February 23, 2013, 11:12
www.24taas.com , नवी दिल्ली अजून ज्या लोकांनी ‘आधार क्रमांक’ घेतले नसतील त्यांनी लवकरात लवकर आधार कार्डासाठी अर्ज भरावेत, असे आदेशच दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिलेत. दिल्लीमध्ये ३१ मार्चपर्यंतच आधार कार्डांची प्रक्रिया सुरू राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
त्यामुळे दिल्लीतील ज्या नागरिकांनी आधार क्रमांकासाठी अद्यापही अर्ज भरलेला नसेल त्यांची धावपळ उडणार आहे. विकास योजनांना आधार क्रमांकाबरोबर लवकरात लवकर संलग्न करण्यासाठी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलंय. एका उच्चस्तरीय बैठकीत दिक्षित यांनी यासंबंधीच्या सूचना केल्यात.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत १.२० करोड लोकांना आधार कार्ड पुरवण्यात आलेत.
First Published: Saturday, February 23, 2013, 11:04