Last Updated: Sunday, October 6, 2013, 12:10
www.24taas.com , वृत्तसंस्था, नवी दिल्ली सोळा वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू हे आपल्या आश्रमातील सेवकांना नपुंसक बनवत असत, असा धक्कादायक आरोप त्यांच्या एका सेवकाने केला आहे. त्या सेवकाचे नाव शिवनाथ असे आहे.
शिवनाथ याने आरोप केला आहे,की `बापू त्यांच्या पुरुष सेवकांना काही जडी बूटी खाण्यासाठी देत असत. ती खाल्ल्यानंतर ते नपुंसक होत, हे सेवक पुन्हा आपल्या पत्नीकडे परत जाऊ नयेत आणि आश्रमातील इतर महिला सेवकांकडेही आकर्षित होऊ नयेत, यासाठी आसाराम असे करीत,` असा दावाही शिवनाथने केला आहे. तो पुढे म्हणतो, `अनेक जोडप्यांमध्ये आश्रमाच्या कायद्यामुळे वैवाहिक बेबनाव निर्माण होत असे.
लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोन सप्टेंबरपासून आसाराम बापू जोधपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात आहेत. राजस्थान हायकोर्टाने एक ऑक्टोबरला त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, October 6, 2013, 12:10