नारायण साई फरार! सुरत पोलिसांची `लुकआऊट` नोटीस,Narayan Sai untraceable, lookout notice issued

नारायण साई फरार! सुरत पोलिसांची `लुकआऊट` नोटीस

नारायण साई फरार! सुरत पोलिसांची `लुकआऊट` नोटीस
www.24taas.com, झी मीडिया, सुरत

सोळा वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू आणि मुलगा नारायण साई याच्यावर सुरत येथे बलात्काराचा गुन्हा् दाखल झाला आहे. नारायण साई फरार असून, परदेशात पळून जाण्यावची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सुरत पोलिसांनी `लुकआऊट` नोटीस काढली आहे.

मागील दोन दिवसांपासून नारायण साईचा ठावठिकाणा नाही. सुरत पोलिसांनी नारायण साईसोबतच आसाराम बापूची पत्नी लक्ष्मी आणि मुलगी भारती यांच्याविरुद्धही नोटीस काढली आहे.

सुरतच्या जहांगिरपुरा पोलिस ठाण्यात दोन बहिणींनी तक्रार दाखल केली होती. त्या नंतर पोलिस आयुक्त राकेश अस्था्ना यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दोन्ही बहिणी अतिशय गरीब कुटुंबातील आहेत. आयुर्वेदीक औषधी बनविण्या‍चे काम या बहिणी आसारामच्या आश्रमात करीत होत्या. लैंगिक शोषणावेळी दोघींपैकी एक बहीण अल्पवयीन असावी असा संशय पोलिसांना आहे.

दाखल तक्रारीनुसार, आसाराम बापूने अहमदाबाद येथे मोठ्या बहिणीचा बलात्‍कार केला तर, नारायण साईने सुरत येथे लहान बहिणीवर बलात्कार केला. २००२ ते २००४ या कालावधीत या घटना घडल्यात. या तक्रारीत आसारामची मुलगी भारती आणि पत्नी लक्ष्मी यांच्या नावाचाही उल्लेय आहे. दोघींनी आसाराम आणि नारायण साईची मदत केल्याचा आरोप आहे.

या बहिणींपैकी मोठी ३७ वर्षांची तर, लहान ३० वर्षांची आहे. मोठी बहीण १० वर्षे आसारामच्या आश्रमात राहीली. तर लहान बहीण २००० ते २००४ या कालावधीत आश्रमात होती. दोघीही विवाहीत असून तक्रार दाखल करण्यापूर्वी त्यांनी पतीचा विश्वास संपादन केला आहे. आसाराम बापू लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे तुरुंगात गेल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्याची हिम्मत झाली, असे पीडित बहिणींनी सांगितले.

आसारामची प्रवक्ता नीलम दुबे हिने सर्व आरोप फेटाळले आहेत. या बहिणी भयग्रस्तो होत्या तर, आज त्यांचे भय कसे काय दूर झाले, असा सवाल तिने केला आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, October 7, 2013, 15:35


comments powered by Disqus